त्या शिक्षकांची होणार चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:34 AM2021-07-07T04:34:35+5:302021-07-07T04:34:35+5:30
चंद्रपूर : ब्रह्मपुरीतील त्या असंवेदनशील शिक्षकांची आता चौकशी होणार असून, यासंदर्भात त्यांना नोटीसही पाठविण्यात येणार आहे. यासंदर्भात सोमवारी पार ...
चंद्रपूर : ब्रह्मपुरीतील त्या असंवेदनशील शिक्षकांची आता चौकशी होणार असून, यासंदर्भात त्यांना नोटीसही पाठविण्यात येणार आहे. यासंदर्भात सोमवारी पार पडलेल्या जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीमध्ये ठराव पारित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, समाजाला दिशा देणाऱ्या शिक्षकांनीच असंवेदनशील काम केल्यामुळे समाजमाध्यमात त्यांचा सर्वत्र निषेध नोंदविण्यात आला. शिक्षण समितीच्या ठरावानंतर आता त्या शिक्षकांवर काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
येथील गांधीनगर वाॅर्डातील एका नऊ वर्षीय बालकाचा गुरुवारी पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही बाब तो ज्या शाळेत शिकत होता. त्या शिक्षकांनी समजली. त्यांनी मृतक मुलाच्या आई-वडिलांना आर्थिक मदत केली. मात्र, मृतक विद्यार्थ्याला खुर्चीवर बसवून त्याच्या पालकाला पैसे देतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले. यानंतर त्या शिक्षकांचा सर्वत्र निषेध नोंदविण्यात आला. विशेष म्हणजे, शिक्षण समितीने घेतलेल्या ठरावात शिक्षकांसह गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी तसेच शिक्षकांचीही चौकशी होणार असल्याची माहिती समजली.
बाॅक्स
ह्या ठरावावरची चर्चा
शिक्षण समितीची पार पडलेल्या बैठकीमध्ये शाळांना भेटी, शाळा बांधकाम, बाला पेंटिंगची पाहणी, विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम, स्वाध्याय पुस्तिका यावर चर्चा करण्यात आली. दरम्यान, समिती सदस्य लवकरच शाळांना भेटीही देणार आहेत. शिक्षण समितीच्या पार पडलेल्या सभेमध्ये शिक्षण सभापती रेखा कारेकर, सदस्य क्रिष्णा सहारे, पृथ्वीराव अवताडे, योगिता डबले, रंजीत सोयाम, मेघा नलगे, कल्पना पेचे, निमंत्रित सदस्य जे. डी. पोटे, शिक्षणाधिकारी दीपेंद्र लोखंडे आदींची उपस्थिती होती.