‘त्या’ दोन योजनांनी बदलविले 24 हजार रुग्णांचे आयुष्य !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2022 05:00 AM2022-05-29T05:00:00+5:302022-05-29T05:00:24+5:30

महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना ही राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी आरोग्य विमा योजना आहे. तर आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना ही केंद्र सरकारची आरोग्य विमा योजना असून, २३ सप्टेंबर २०१८ पासून राज्यात लागू  आहे. सुधारित महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेसोबत केंद्राची आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जनआरोग्य योजना राज्यात १ एप्रिल २०२० पासून एकत्रित लागू झाली आहे.

'Those' two schemes changed the lives of 24,000 patients! | ‘त्या’ दोन योजनांनी बदलविले 24 हजार रुग्णांचे आयुष्य !

‘त्या’ दोन योजनांनी बदलविले 24 हजार रुग्णांचे आयुष्य !

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : केंद्र व राज्य सरकारने महात्मा फुले जनआरोग्य आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत  चंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंत २४ हजार ५१ रुग्णांना दुर्धर आजारासाठी स्वत:जवळचा एकही पैसा खर्च न करता मोफत उपचार मिळाले आहेत. त्यांच्या उपचाराची ५० कोटी ४५ लाख ४१ हजार २७५ रुपयांची रक्कम शासनाने जमा केली आहे.
महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना ही राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी आरोग्य विमा योजना आहे. तर आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना ही केंद्र सरकारची आरोग्य विमा योजना असून, २३ सप्टेंबर २०१८ पासून राज्यात लागू  आहे. सुधारित महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेसोबत केंद्राची आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जनआरोग्य योजना राज्यात १ एप्रिल २०२० पासून एकत्रित लागू झाली आहे. आयुष्यमान भारत योजनेच्या सुरुवातीपासून जिल्ह्यात दोन्ही योजनेंतर्गत आतापर्यंत २५ हजार ५१ रुग्णांच्या उपचारासाठी शासनाने ५० कोटी ४५ लाख ४१ हजार २७५ रुपये खर्च केले आहे. लाभ घेणाऱ्या रूग्णांत शहरी व ग्रामीण भागाचा समावेश   आहे.

सर्वाधिक ७८४६ रुग्ण मेडिकल ऑन्कॉलॉजीचे
मेडिकल ऑन्कॉलॉजीचे सर्वाधिक ७८४६, नेफ्रॉलॉजी  १६५५, न्युरॉलॉजी १८४, न्युरोसर्जरी ४५८, ॲपथमॅलॉजी सर्जरी १०१४, आर्थोपेडिक सर्जरी ८६६, पेडियाट्रिक कॅन्सर ७, पेडियाट्रिक सर्जरी ३१८, पेडीयाट्रिक्स मेडिकल मॅनेजमेंट ४७३, प्लास्टिक सर्जरी ७, पॉलीट्रॉमा २०७६, प्रोस्थेसेस ४, पलमनोलॉजी १८६५, रेडीएशन ॲन्कोलॉजी १३२६, हृयुमॅटोलॉजी १, सर्जकल गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजी ३७ आणि सर्जिकल अँकोलॉजीचे उपचार १ हजार ५७ अशा एकूण २४ हजार ९५१ रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आले.

रुग्णांना मिळालेले उपचार व शस्त्रक्रिया 
जळालेले केसेस २९ रुग्ण, कार्डियाक अँड कॉर्डियोथेरॉयिक सर्जरी ५७७ रुग्ण, कार्डिओलॉजी १२५९, क्रिटिकल केअर ७४, डरमॅटोलॉजी २२, ईएनटी सर्जरी ३५७, एन्डोक्रिनोलॉजी १३४, जनरल मेडिसीन ५९, गॅस्ट्रोएन्ट्रॉलॉजी १३५, जनरल सर्जरी ८३४, गॅयनोकॉलॉजी अँड ॲबस्टेस्ट्रिक सर्जरी ३७६, जेनिटोरीनरी सर्जरी ५२४, हेमॅटोलॉजी २४, इंटरव्हेंशनल रेडिओलॉजी १६५ व २८८ जणांवर इनव्हेंस्टिगेशनसाठी मोफत उपचार करण्यात आला. दोन्हीही योजनांत ५० पेक्षा जास्त आजारावर मोफत उपचार केला जातो.

 

Web Title: 'Those' two schemes changed the lives of 24,000 patients!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.