ब्रम्हपुरी-सिंदेवाही पर्यटन क्षेत्राबाबत होणार विचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:30 AM2021-08-23T04:30:37+5:302021-08-23T04:30:37+5:30
दत्तात्रय दलाल ब्रम्हपुरी : ब्रम्हपुरी वन विभागाला संरक्षित क्षेत्र घोषित करावे, याबाबतचे वृत्त तसेच वन विभागाने ३२ गावांमध्ये ...
दत्तात्रय दलाल
ब्रम्हपुरी : ब्रम्हपुरी वन विभागाला संरक्षित क्षेत्र घोषित करावे, याबाबतचे वृत्त तसेच वन विभागाने ३२ गावांमध्ये प्राथमिक बचाव दल तयार केले आहेत, असे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते. या वृत्ताची दाखल राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी घेतली. मानव - वन्यजीव संघर्ष उपाययोजना व इको-टुरिझमबाबत येत्या दोन-तीन दिवसात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेणार असल्याचे त्यांनी ब्रम्हपुरी येथे शुक्रवारी आढावा बैठकीत सांगितले.
यावेळी ना. वडेट्टीवार म्हणाले की, ब्रम्हपुरी वन विभागातील वाघांची संख्या ताडोबापेक्षा जास्त असून १५० गावे संवेदनशील आहेत. मानव - वन्यजीव संघर्ष शिगेला पोहोचल्याने वन विभागाने ठोस उपाययोजना कराव्यात. संवेदनशील गावांतील तरुणांना प्रशिक्षण देण्याच्या सूचना त्यांनी केल्या. ब्रम्हपुरी वनक्षेत्रात ११४ वाघ व ११० बिबट्यांचा वावर आहे. स्थानांतर करण्याबाबत धोरण निश्चित करावे. जनधन विकास योजनेंतर्गत शेतीला सोलर व चेनलिंक कुंपण करावे. जंगलाला लागून असलेल्या शेतावर जाऊ नये म्हणून यासाठी दहा हजारांची मदत श्यामाप्रसाद योजनेतून राबविण्यात येईल. तसेच संवेदनशील १२५ गावांना दरवर्षी २५ लाखांचा निधी देण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
येत्या काळात इको-टुरिझम निर्मिती झाल्यास मानव - वन्यजीव संघर्ष कमी होईल. बफर क्षेत्र म्हणून ओळख निर्माण होऊन स्थानिकांना रोजगार मिळणार आहे.
220821\screenshot_2021_0817_072333.png
प्रकाशित वृत्त