हजारो एकर जमीन सिंचनाखाली येणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 11:06 PM2019-06-26T23:06:42+5:302019-06-26T23:07:14+5:30
लोंढोली, हरंभा, साखरी, सिर्सी, डोणाळा, काढोळी परिसरामध्ये शेतीच्या सिंचनाचा फार मोठा प्रश्न आहे. परिणामी, धान उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. ही समस्या सोडविण्यासाठी गोसेखुर्दचे पाणी देण्याची मागणी १३ वर्षांपासून सुरू आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सावली : लोंढोली, हरंभा, साखरी, सिर्सी, डोणाळा, काढोळी परिसरामध्ये शेतीच्या सिंचनाचा फार मोठा प्रश्न आहे. परिणामी, धान उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. ही समस्या सोडविण्यासाठी गोसेखुर्दचे पाणी देण्याची मागणी १३ वर्षांपासून सुरू आहे. प्रकल्पाची कामे पूर्ण करण्यासाठी १०० कोटींची निविदा काढण्यात आली. यातून कामे पूर्ण होतील आणि हजारो एकर जमीन सिंचनाखाली येणार आहे, अशी माहिती विधानसभेचे विरोधी पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी बुधवारी लोंढोली येथील बैठकीत दिली. यावेळी वन व सिंचन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
परिसरातील गावांना पाणी मिळणार की नाही असा प्रश्न नागरिकांकडून सतत विचारला जात होता. त्यामुळे ४०० ते ५०० शेतकऱ्यांच्या उपस्थितीत ही बैठक घेण्यात आली. यावेळी आ. वडेट्टीवार यांनी प्रकल्प आणि शेतीचा नकाशा दाखवून शेतकºयांना आश्वास्त केले. १०० टक्के पाणी मिळेल. कामाची सुरुवात केलेली आहे. कोणत्याही परिस्थितीत पुढच्या वर्षी हजारो एकर सिंचनाखाली, अशी ग्वाही दिली. दरम्यान, सिंचन विभागातील अधिकाºयांनीही गोसेखुर्द प्रकल्पाची शेतकºयांनी माहिती दिली. वाघोली बुटी सिंचन प्रकल्पामुळे अनेक शेतकºयांना पाणी मिळत नाही. शेकडो शेतकºयांना वंचित राहावे लागत आहे. अशा परिस्थितीमध्ये शेती वाचविण्याकरीता पुढील वर्षी कोणत्याही परिस्थितीत हे गाव वाघोली बुटी सिंचन प्रकल्पापासून बाजुला केल्या जाईल. वाघोली बुटी लिफ्ट इरिगेशन योजना सुरू न करता थेट त्याच कालव्यात गोसेखुर्दचे पाणी टाकून शेतकºयांची सिंचनाखाली आणू, अशी माहिती विधानसभा विरोधी पक्षनेते आ. वडेट्टीवार यांनी दिली. यावेळी उपस्थित शेतकºयांनी परिसरातील विविध समस्यांकडे लक्ष वेधले. सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष यशवंत बोरकुटे जि. प. चे माजी बांधकाम सभापती, दिनेश चिटनूरवार, माजी प. स. सभापती, राकेश गड्डमवार, लोंढोलीच्या सरपंच लता कोमलवार, उपसरपंच दिलीप लटारे, मनोज खोबे, शंकर बोदलकर, मदन दुर्गे, भाऊजी बोदलकर, दिलीप गोवर्धन, पुंडलीक कुकडे, देवेन्द्र खोबे, गणेश भांडेकर, अर्चना भोयर, संगीता खोबे, शिला म्हशाखेत्री, आशिष मनबततुलवार, मुन्ना भांडेकर, मोहन कुनघाडकर, प्रवीण संतोषवार, आदींसह नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते.
समस्यांकडे वेधले लक्ष
सावली तालुक्यातील प्रलंबित समस्यांचा निपटारा करण्याची मागणी नागरिकांनी विरोधी पक्षनेते आ. वडेट्टीवार यांच्याकडे केली. सिंचनाअभावी शेतीचे कसे नुकसान होत आहे, याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. पाणी नसल्याने धानाचे उत्पादन घटले. त्यामुळे पुढील हंगामात हा प्रश्न सोडविण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी यावेळी केली.