हजारो भाविकांनी केले अभ्यंगस्नान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2018 10:22 PM2018-11-23T22:22:48+5:302018-11-23T22:23:13+5:30
वर्धा-पैनगंगा नदीच्या संगमावर यात्रेनिमित्त हजारो भाविकांनी अभ्यंगस्रान करुन विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले. भाविकांसाठी विविध सेवाभावी सामाजिक संस्थांनी सोईसुविधा पुरविल्या. शेतकऱ्यांसाठी जागृतीपर प्रदर्शनी लावण्यात आली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
घुग्घुस : वर्धा-पैनगंगा नदीच्या संगमावर यात्रेनिमित्त हजारो भाविकांनी अभ्यंगस्रान करुन विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले. भाविकांसाठी विविध सेवाभावी सामाजिक संस्थांनी सोईसुविधा पुरविल्या. शेतकऱ्यांसाठी जागृतीपर प्रदर्शनी लावण्यात आली होती.
वर्धा-पैनगंगा नदीचा संगम, उत्तर वाहिनी व विदर्भातील छोटे पंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या वढा येथे कार्तिक पौणिमेला पंचक्रोशीच नव्हे तर विदर्भातून हजारो भाविक संगमावर पहाटेपासूनच अभ्यंगस्रानाकरिता गर्दी करतात. येथील मंदिरातील विठ्ठलरूक्मिणी मूर्तीचे दर्शन रांगा लावतात. मागील दहा वर्षांपूर्वी नदीच्या दुसºया काठावर प्राचीन जुगाद येथे शिवमंदिर असल्याने नदी ओलांडून भाविक दर्शनाला जातात. यंदा घुग्घुस येथील प्रियदर्शनी कन्या कनिष्ट महाविद्यालयाचे स्काऊट गाईड, रोटरी इनव्हिल क्बलच्या वतीने प्राचार्य स्मिता ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्नु खानझोडे व विद्यार्थिनींनी यात्रेकरूंना सोईसुविधा पुरविल्या. अंबुजा सिमेंट फांऊडेशनच्या वतीने कृषी प्रदर्शनी लावण्यात आली होती. व्यवस्थापक नागेश कांबळी, प्रक्षेत्र अधिकारी विष्णू सुर्यवंशी, कैलाश जाधव, स्नेहा मशारकर, मेघा गेडाम, चंद्रकांत रामटेके आदींनी कापूस उत्पादनाबाबत शेतकºयांना मार्गदर्शन केले. पाचशेपेक्षा अधिक शेतकºयांनी या प्रदर्शनीचा लाभ घेतला.