हजारो भाविकांनी घेतले दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2019 10:13 PM2019-02-08T22:13:34+5:302019-02-08T22:13:55+5:30

विदर्भातील श्रद्धास्थान संत परमहंस कोंडय्या महाराज यात्रेनिमित्त शुक्रवारी हजारो भाविकांनी समाधी स्थळाचे दर्शन घेतले.

Thousands of devotees took the view | हजारो भाविकांनी घेतले दर्शन

हजारो भाविकांनी घेतले दर्शन

Next
ठळक मुद्देकोंडय्या महाराज यात्रा : आज अग्निकुंड विधी

लोकमत न्यूज नेटवर्क
धाबा : विदर्भातील श्रद्धास्थान संत परमहंस कोंडय्या महाराज यात्रेनिमित्त शुक्रवारी हजारो भाविकांनी समाधी स्थळाचे दर्शन घेतले.
शनिवारी भाविक अग्निकुंडातून चालणार आहेत. तेलंगणा व महाराष्टÑातील हजारो भाविक यात्रेसाठी दरवर्षी येतात. विविध कार्यक्रमांची रेलचेल असते. सात दिवस चालणाऱ्या यात्रेकरीता अन्नदात्यांकडून महाप्रसादाचे वितरण केल्या जाते. शुक्रवारी भंगाराम तळोधी येथील व्यापारी विवेक गोनपल्लीवार बाबूराव बोमकंटीवार व अन्य दात्यांकडून महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला. उत्सवानिमित्त मंदिर परिसर व गाभारा प्रकाशमय करण्यात आला आहे. अग्निकुंडाचा कार्यक्रम जंगम पुरोहित रामेश्वर शेगमवार महाराज व त्यांच्या सहकार्याकडून होणार आहे.

Web Title: Thousands of devotees took the view

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.