वढा यात्रेला हजारो भाविक करणार स्नान
By admin | Published: November 14, 2016 12:57 AM2016-11-14T00:57:00+5:302016-11-14T00:57:00+5:30
वढा हे गाव लहान पंढरपूर म्हणून प्रसिद्ध आहे. याठिकाणी वर्धा-पैनगंगा आणि उत्तरवाहिनी या नद्यांचा संगम आहे.
घुग्घुस : वढा हे गाव लहान पंढरपूर म्हणून प्रसिद्ध आहे. याठिकाणी वर्धा-पैनगंगा आणि उत्तरवाहिनी या नद्यांचा संगम आहे. याठिकाणी दर कार्तिक पोर्णिमेनिमिला यात्रा भरत असते. यावेळी या नदीवर अनेक भक्तजन स्नान करण्यासाठी दुरवरून येत असतात. त्यामुळेच सोमवारला वढा येथे पहाटेपासूनच हजारो भाविक हजेरी लावणार आहे. त्यामुळे प्रवाशांसाठी एसटी महामंडळाने यात्रा बसेस सुरु केल्या आहेत.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा वढा ग्रामपंचायतने यात्रेकरूना मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नदीचा प्रवाह गावाच्या बाजूला असल्याने यात्रेत व्यवसायिक दुकानदारांना आपली दुकाने नदीच्या वरच्या भागात थाटावी लागणार आहे. नदीत हजारो महिला, पुरुष, आबालवृद्ध स्नानाकरीता हजेरी लावणार आहेत. त्यादृष्टीने सुरक्षीतेसाठी उपाययोजना करण्यात आली आहे. भाविकांना बाहेर गावावरून येणा- जाण्या करीता चंद्रपूर आगरातून आठ बसेस दिवसभर ये-जा करण्याची तथा भद्रावती, वरोरा मागार्ने याञेकरूकरीता पडोली वरून बसची भोयेगांव मार्गे व घुग्घुस -वढा दिवसभर एका बसची व्यवस्था करण्यात आली आहे. कुठल्याही प्रकारची अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस विभागाच्या वतीने स्थानिक पोलीस ठाण्याचे ४० व बाहेरून ६५ अधिकारी, पोलिस कर्मचारी असा शंभर कर्मचाऱ्याचे पथक तैनात करण्यात येणार आहे. त्यामध्ये महिला अधिकारी, पोलीस कर्मचारी राहणार आहे. वाहनाची वाहतूकी सुरळीत ठेवण्याकरीता वाहतुक पोलीस कर्मचाऱ्यांची पांढरकवडा व वढा दरम्यान तैनाती करण्यात येणार आहे.
नदीच्या काठावरील विठठल रखुमाई मंदिर तर दुसऱ्या काठावरील प्राचीन हेमाडपंती शिव मंदिराचे दर्शन घेण्यासाठी भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. (वार्ताहर)