हजारो हेक्टर शेती पाण्याविना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 12:37 AM2018-10-22T00:37:10+5:302018-10-22T00:38:21+5:30
आसोलामेंढा तलाव पाथरी परिसरातील शेतकऱ्यांना वरदान तर पेंढरी परिसरातील शेतकऱ्यांसाठी शाप ठरत आहे. परिसरात आसोलामेंढा तलावाचा कोणत्याही प्रकारचा कालवा नाही. परंतु आसोलामेंढा तलावाच्या नावाखाली शेतकऱ्यांला पिक विमा मिळत नाहीं.
सुनिल दहेलकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
सावली : आसोलामेंढा तलाव पाथरी परिसरातील शेतकऱ्यांना वरदान तर पेंढरी परिसरातील शेतकऱ्यांसाठी शाप ठरत आहे. परिसरात आसोलामेंढा तलावाचा कोणत्याही प्रकारचा कालवा नाही. परंतु आसोलामेंढा तलावाच्या नावाखाली शेतकऱ्यांला पिक विमा मिळत नाहीं. या परिसरात हजारो हेक्टर शेतीचे क्षेत्र ओलिताखाली आहे. सद्यस्थितीत धान पिकांना पाणी मिळत नसल्याने धान शेती पाण्यापासून वंचित आहे.
तालुक्यातील पेंढरी परिसरात हजारो हेक्टर शेतीवर धान पिकाची लागवड केली आहे. या परिसरात सायमारा, मेंढा, मुण्डाला, पेंढरी, मरेगाव, चक मनकापूर, भारपायली, चारगाव, पणधारसराड, हिरापूर इत्यादी गावे येतात. समाजाचा विकास आणि देशाची आर्थिक भरभराट शेतीवर आहे. ग्रामीण भागात ८० टक्के कुटुंबातील सदस्याचे पोट शेतीवर अवलंबून आहे. तालुक्यात बोड्या, तलावासारखे पाण्याचे स्रोत मोठ्या प्रमाणात आहेत. परंतु पाणी साठवणूक करण्याचे तंत्र आजपर्यंत पाहिजे त्या प्रमाणात प्रशासनाला करता आले नाही. जलस्रोत वाढले नाही. याकरिता शासनाला आणखी जोर लावणे गरजेचे झाले आहे. आसोलामेंढा तलावाचा पेंढरी परिसरातील शेतकऱ्याला पाण्याचा लाभ मिळत नाही. यापेक्षा दुसरे दुर्दैव काय असेल ?
सिंचन क्षेत्रात शिस्त आणण्याची शासन एकीकडे घोषणा करते. सिंचन क्षेत्राचा अनुशेष भरून काढण्यासाठी विधानमंडळात आवाज उठविला जातो. पंरतु सिंचनाच्या सुविधा पाहिजे त्या प्रमाणात अजूनही मिळत नाहीत, ही शोकांतिका आहे. जलयुत शिवाराची चर्चा राज्यभर खूप झाली. जलयुक्त शिवार हा दुष्काळमुक्तीचा संकल्प पेंढरी परिसरात कूचकामी ठरतोय. परिसरात पाणी टंचाई असल्याने धान पीक ओंबीवर येत असताना जमिनीत ओलावा नाही. शेतीला भेगा जात आहेत. त्सिंचनाच्या सुविधांची कमतरता आहे. त्यावर उपाययोजना होताना दिसून येत नाही. त्यामुळे प्रशासकीय इच्छाशक्तीचा अभाव दिसून येतो. परिणामी शेतकरी चिंतेत आहे. आसोलामेंढातील पाणी उपलब्ध करुन देण्याची मागणी सरपंच बंडू मेश्राम, दामोदर गोबाडे, शेतकरी दशरथ शेडमाके, नामदेव कस्तुरे आदींनी केली आहे.