ऐतिहासिक मोर्च्यात नरेश पुगलिया यांच्या नेतृत्वात हजारो कार्यकर्त्यांचा सहभाग

By admin | Published: December 11, 2015 01:38 AM2015-12-11T01:38:45+5:302015-12-11T01:38:45+5:30

केंद्रात व राज्यात असणारे भाजपा प्रणित सरकारे विकासाच्या सर्व आघाड्यांवर अपयशी ठरल्याच्या निषेधार्थ काँग्रेस ..

Thousands of party workers participated in the historic march of Naresh Puglia | ऐतिहासिक मोर्च्यात नरेश पुगलिया यांच्या नेतृत्वात हजारो कार्यकर्त्यांचा सहभाग

ऐतिहासिक मोर्च्यात नरेश पुगलिया यांच्या नेतृत्वात हजारो कार्यकर्त्यांचा सहभाग

Next

चंद्रपूर : केंद्रात व राज्यात असणारे भाजपा प्रणित सरकारे विकासाच्या सर्व आघाड्यांवर अपयशी ठरल्याच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाच्या वतीने ८ डिसेंबर रोजी नागपूर येथील विधानभवनावर मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात चंद्रपूर येथून माजी खासदार नरेश पुगलिया व युवानेता तथा महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे माजी महासचिव राहुल पुगलिया यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील हजारो कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता.
पावसाच्या लहरीपणामुळे अतिवृष्टी, अवर्षण, योग्य वेळी पावसाचा अभाव आदी कारणामुळे शेतमालाचे अतोनात नुकसान झाले. नापिकीमुळे तसेच शेतकऱ्यांच्या शेतमालाचे भाव पडल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला. शेतमालांना आधारभूत व योग्य भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकरी गर्भगळीत झाले असून त्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे. परंतु, या गंभीर बाबींकडे सरकारचे लक्ष नाही, याकडे लक्ष वेधण्यासाठी मोर्चा काढण्यात आला.
मोर्चात विदर्भ किसान मजदूर काँग्रेस, चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस, जिल्हा एन.एस.यु.आय. चे पदाधिकारी व शेतकरी तीन हजार पेक्षा जास्त संख्येने सहभागी झाले होते. नरेश पुगलिया यांच्या नेतृत्वातील या मोर्च्यात युवानेते राहुल पुगलिया, चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष गजानन गावंडे, माजी आमदार बाबुराव वाघमारे, चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे महासचिव तथा नगरसेवक अशोक नागपुरे, प्रवीण पडवेकर, संजय महाडोळे, मनपाचे गटनेता प्रशांत दानव, नगरसेवक उषा धांडे, सकीना अंसारी, पारनंदी, राजेश रेवल्लीवार, देविदास गेडाम, बापू अंसारी, बल्लारपूरचे माजी नगराध्यक्ष घनश्याम मुलचंदानी, नगराध्यक्ष छाया मडावी, नासीरखान देवेंद्र आर्य, व्यंकटेश बालबरैय्या, ओमेश्वर पदमगिरीवार, रत्नमाला बावणे, अविनाश जाधव, विनोद अहिरकर, वैशाली पुल्लावार, मंगला आत्राम, देवेंद्र बेले, रामभाऊ टोंगे आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Thousands of party workers participated in the historic march of Naresh Puglia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.