नोंदणी केलेले हजारो शेतकरी विक्रीच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 12:20 AM2019-04-26T00:20:34+5:302019-04-26T00:20:54+5:30

हमीभावाने तुरीची विक्री करावी, याकरिता हजारोे शेतकऱ्यांनी नाफेडकडे आॅनलाईन पद्धतीने नोंदणी केली. नाफेडने संथगतीने तूर खरेदी केली. त्यातच अनेक अडचणी आल्या होत्या. आता शासनाने २० एप्रिलनंतर नाफेडने तूर खरेदी करु नये, असे कळविले.

Thousands of registered farmers are waiting for sale | नोंदणी केलेले हजारो शेतकरी विक्रीच्या प्रतीक्षेत

नोंदणी केलेले हजारो शेतकरी विक्रीच्या प्रतीक्षेत

Next
ठळक मुद्देआता शेतकऱ्यांनी करावे काय? : नाफेडच्या तूर खरेदीची शासकीय मुदत संपली

प्रवीण खिरटकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
वरोरा : हमीभावाने तुरीची विक्री करावी, याकरिता हजारोे शेतकऱ्यांनी नाफेडकडे आॅनलाईन पद्धतीने नोंदणी केली. नाफेडने संथगतीने तूर खरेदी केली. त्यातच अनेक अडचणी आल्या होत्या. आता शासनाने २० एप्रिलनंतर नाफेडने तूर खरेदी करु नये, असे कळविले. त्यामुळे आॅनलाईन नोंदणी करुनही हजारो शेतकरी नाफेडकडे तूर विक्रीच्या प्रतीक्षेत आहेत.
शेतकºयांचे तूर पीक निघताच बाजारातील भाव पडले. त्यामुळे शासनाने तुरीकरिता हमीभाव जाहीर केला. शासनाच्या वतीने नाफेडमार्फत शेतकºयांना तूर खरेदी केली जात होती.
याकरिता शेतकºयांनी पेरीपत्र, सातबारा, आधार कार्ड, बँक पासबुकची सांक्षाकित प्रत आदी घेवून नाफेडकडे आॅनलाईन अर्ज केले. या अर्जानुसार शेतकºयांना लघु संदेश किंवा भ्रमणध्वनीवर कॉल करुन तूर खरेदीकरिता बोलावले जात होते. नाफेडने सुरुवातीला बारदान्याची कमतरता, मोजणीकरिता पुरेसे मनुष्यबळ नसणे साहित्याची जुळवाजुळव करताना अगदी संथगतीने तूर खरेदी केली.
त्यामुळे शेकडो शेतकरी लघुसंदेशाची वाट बघत असताना २० एप्रिल ही खरेदीची अंतीम तारीख आली आणि नाफेडने तूर खरेदी बंद केली. त्यामुळे शेकडो शेतकºयांनी नोंदणी करुन तुरी घरीच ठेवाव्या लागल्या आहे. तूर घरात अधिक दिवस ठेवल्यास त्याची प्रतवारी खराब होवून बाजारात कवडीमोल भावाने तूर विकाव्या लागणार असल्याचे दिसून येत आहे.
आचारसंहितेचा फटका?
शासनाने नाफेडला तूर खरेदीची अंतीम तारीख २० एप्रिल दिली होती. त्यामुळे तूर खरेदी परत सुरु करण्यास शासनास निर्णय घ्यावा लागेल. परंतु अजूनही राज्यात अनेक ठिकाणी मतदान होणे शिल्लक असल्याने तूर खरेदी परत सुरु करण्याकरिता आचारसंहितेची आडकाठी येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
गोदामे निवडणुकीने व्याप्त
नाफेडकडून ज्या ठिकाणी तूर खरेदी करुन ठेवली जाते. ती बहुतांश गोदामे निवडणूक विभागाने अनेक दिवसांपूर्वी ताब्यात घेतली आहे. त्यामुळे गोदामे शिल्लक नसल्याने काही काळ नाफेडने तूर खरेदी थांबविली असल्याचे समजते. निवडणुकीच्या काळात त्या ठिकाणी कुणासही जाणस निर्बंध असल्याने तूर खरेदी बंद होती. २० एप्रिलपूर्वी एकाच आठवड्यात दोन सुट्ट्या आल्या. त्यामुळे त्या आठवड्यातही पाहिजे त्या प्रमाणात तूर खरेदी झाली नाही.

शासनाने २० एप्रिलपर्यंत तूर खरेदी करण्याचे आदेश दिल्याने तूर खरेदी बंद करण्यात आली आहे. तूर खरेदीबाबत अद्याप कुठलेही आदेश प्राप्त झाले नाही.
- विवेक मारकवार, केंद्रप्रमुख, नाफेड

Web Title: Thousands of registered farmers are waiting for sale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.