रोजगार मेळाव्यात हजारो युवकांचा सहभाग

By Admin | Published: May 26, 2015 01:16 AM2015-05-26T01:16:56+5:302015-05-26T01:16:56+5:30

स्थानिक सोमय्या पॉलिटेक्नीक कॉलेजमध्ये सामाजिक कार्यकर्ते किशोर जोरगेवार, सोमय्या पॉलिटेक्नीक, प्रो-अ‍ॅक्टीव्ह

Thousands of youth participate in the Employment Meet | रोजगार मेळाव्यात हजारो युवकांचा सहभाग

रोजगार मेळाव्यात हजारो युवकांचा सहभाग

googlenewsNext

चंद्रपूर: स्थानिक सोमय्या पॉलिटेक्नीक कॉलेजमध्ये सामाजिक कार्यकर्ते किशोर जोरगेवार, सोमय्या पॉलिटेक्नीक, प्रो-अ‍ॅक्टीव्ह आय.टी. सर्व्हिसेस यांच्या संयुक्त विद्यमाने गुरूवारी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंचावर उपविभागीय अधिकारी कल्पना नीळ, तहसिलदार गणेश शिंदे, किशोर जोरगेवार, संचालक एम.एस.पी.एम. पांडुरंग आंबटकर, प्राचार्य खान, नगरसेवक बलराम डोडाणी, दीपक दापके, गणेश शेंडे, शितल ईटनकर, रंगारी, सायली येरणे, राजेंद्र पुलिपाका, निलेश बेलखडे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
मार्गदर्शन करताना किशोर जोरगेवार म्हणाले, चंद्रपुरातील बहुतेक युवतींनी उच्च शिक्षणात मजल मारली आहे. त्यांचे मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर येथील नामांकित कंपनीत रोजगार मिळविण्याचे स्वप्न आहे. परंतु प्रभावी माध्यमाअभावी त्यांना नामांकित कंपनीत रोजगार उपलब्ध होत नाही. त्यांच्या स्वप्नांची पुर्तता करण्यासाठी व चंद्रपुरातील बेरोजगार युवक-युवतींना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील आहोत. याकरीता या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
या मेळाव्यात चंद्रपूरसह परिसरातील हजारो तरूणांनी सहभाग घेतला. चंद्रपुरात प्रथमच झालेल्या या नाविण्यपूर्ण उपक्रमामुळे तरुणाईत प्रचंड उत्साहाचे वातावरण होते. या मेळाव्यात ३६ कपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी अभिलाष अंतुलवार, महेशचंद्र सोमनाथे, हितेश कोटकर, विलास वनकर, विनोद गोल्लजवार, प्रतिक शिवणकर, प्रफुल पुलगमकर, सुधीर माजरे, अशोक खडके, प्रमोद क्षिरसागर, श्रीकृष्ण नंदुरकर, राहूल भोयर, मनोहर जाधव आदींनी अथक परिश्रम केले. (प्रतिनिधी)
बल्लारपुरात दुर्गामाता मूर्ती स्थापना
बल्लारपूर: येथील राणी लक्ष्मी वॉर्डातील दुर्गामाता मंदिरात मंगळवारी दुर्गामातेच्या मूर्तीची स्थापना केली जाणार आहे. यानिमित्त तीन दिवसीय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.यात गणेशपूजा, कलश पूजा, नवग्रह पूजा, १०८ कलश, जल अभिषेक, दूध व पंचगंध अभिषेक, माताजीची पालखी, हवन, १०८ महिलांकडून कुंकूम पूजा, यज्ञ स्थापना व मूर्ती प्रतिष्ठापना तसेच महाप्रसाद या कार्यक्रमांचा समावेश आहे. याचा भाविकांनी लाभ घेण्याची विनंती करण्यात आली आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Thousands of youth participate in the Employment Meet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.