त्या वाघिणीमुळे गावकऱ्यांना धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:20 AM2021-07-01T04:20:42+5:302021-07-01T04:20:42+5:30

पळसगाव (पिपर्डा ) : ताडोबा बफर झोन अंतर्गत येणाऱ्या पळसगाव व शेती परिसरात बछड्यापासून विरक्त झालेल्या वाघिणीचा धुमाकूळ सुरू ...

That is a threat to the villagers | त्या वाघिणीमुळे गावकऱ्यांना धोका

त्या वाघिणीमुळे गावकऱ्यांना धोका

Next

पळसगाव (पिपर्डा ) : ताडोबा बफर झोन अंतर्गत येणाऱ्या पळसगाव व शेती परिसरात बछड्यापासून विरक्त झालेल्या वाघिणीचा धुमाकूळ सुरू आहे. दररोज डरकाळीचा आवाज व गावाजवळच्या परिसरात वाघिणीचे पगमार्क आढळून येत आहे. त्यामुळे गावकऱ्यांमधील दहशत कायम आहे.

यापूर्वी रामभाऊ चौधरी यांच्या शिवारात वाघाचे पगमार्क दिसल्याने शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आता तर दररोज सकाळी गावाशेजारील तलावाजवळ, शेतात पगमार्क दिसत असल्याने गावात भीती निर्माण झाली आहे. वाघिणीसोबत बछडे नसावे, असे पगमार्कवरून दिसून येते. तरीही वनविभाग वाघीण आणि तिचे बछडे सोबत आहेत, असे सांगत आहेत. बछड्यापासून वाघीण वेगळी झाली असल्यास अनिश्चित प्रकार होण्याची दाट शक्यता आहे. तेव्हा वनविभागाच्या वतीने अधिक गस्त करून गावातील जनतेला रोज दिसणाऱ्या गावाशेजारील पगमार्क व डरकाळीपासून मुक्त करावे,अशी मागणी आहे.

===Photopath===

300621\img-20210630-wa0130.jpg

===Caption===

वाघाचे गावशेजार असलेल्या शेतीजवळी वाघाचे पगमार्क

Web Title: That is a threat to the villagers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.