तीन आंदोलनांनी गाजला सोमवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:30 AM2021-02-16T04:30:06+5:302021-02-16T04:30:06+5:30

स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करावे, राज्यातील लॉकडाऊन काळातील वीज बिल माफ करावे, २०० युनिटपर्यंत वीज मोफत द्यावी, सर्पदंशामुळे ...

Three agitations erupted on Monday | तीन आंदोलनांनी गाजला सोमवार

तीन आंदोलनांनी गाजला सोमवार

Next

स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करावे, राज्यातील लॉकडाऊन काळातील वीज बिल माफ करावे, २०० युनिटपर्यंत वीज मोफत द्यावी, सर्पदंशामुळे मृत्यू झाल्यास इतर वन्यप्राण्यांप्रमाणे मृताच्या कुटुंबाला मदत द्यावी व अन्य मागण्यांसाठी विदर्भ संघर्ष समितीने सोमवारी आंदोलन केले. यावेळी समितीचे अध्यक्ष माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप, प्रभाकर दिवे, जिल्हा कार्याध्यक्ष किशोर दहीकर, अंकुश वाघमारे, अनिल दिकोंडवार, कपिल इद्दे, सय्यद इस्माईल, गिरीधरसिंह बैस, सुधीर सातपुते, राजू बोरकर, सचिन सरपटवार, अ‍ॅड. दीपक चटप, मुन्ना खोब्रागडे, सूरज गव्हाणे, विलास बोबडे, हसन भाई, मारोतराव बोथले, किशोर दांडेकर, बळीराज खुजे, साईनाथ झुरमुरे, बाळकृष्ण काकडे आदी सहभागी झाले होते.

अन्यथा २२ फेब्रुवारीपासून अन्नत्याग

गोंडकालीन ऐतिहासिक वारसा असलेला तलाव अतिक्रमणात गिळंकृत होत असून प्रदूषणाची समस्या गंभीर झाली. यापासून तलावाला मुक्त करावे व खोलीकरणाच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यासाठी इको प्रो व पर्यावरणप्रेमींनी रामाळा तलावाच्या काठावर सत्याग्रह केला. सात दिवसात तोडगा निघाला नाही तर २२ फेब्रुवारीपासून अन्नत्याग सत्याग्रह करण्याचा इशारा बंडू धोतरे यांनी दिला आहे. आंदोलनात निवृत्त वनाधिकारी अभय बडकेलवार, प्रा. सुरेश चोपणे, प्रा.डॉ. योगेश दुधपचारे, श्रीपाद जोशी, उलगुलान संघटनेचे राजू झोडे, तुषार देशमुख, शरीफ, विनायक साळवे, अमर गेही, आशिष अलचलवार, एम. आर. माडेकर, प्रा. किरण मनुरे, प्रा. सुभाष गिरडे, मुकेश भांदककर व अन्य सहभागी झाले होते.

भूमिपुत्रांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

रोजगार दिला नाही तर काम बंद करण्याचा जोरगेवार यांचा इशारा

चंद्रपूर : स्थानिकांना रोजगार द्यावेत, या मागणीसाठी आमदार किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने भूमिपुत्रांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.

कोळसा, पाणी, जागा आमची आणि रोजगार बाहेरच्यांना असाच काहीसा प्रकार वेकोलिअंतर्गत चालणाऱ्या खासगी कंपन्यांमध्ये सुरू आहे. मात्र आता हे चालू देणार नाही. चंद्रपुरात काम करायचे असेल तर भूमिपुत्रांना रोजगार द्यावाच लागेल अन्यथा काम बंद पाडू, असा इशारा आमदार किशोर जोरगेवार यांनी आंदोलनादरम्यान दिला आहे. चंद्र्रपूर हे औद्योगिक शहर म्हणून ओळखल्या जाते. शहराभोवती वेकोलिच्या खाणी आहेत. याचा मोठा दुष्परिणाम चंद्रपूरकरांना सोसावा लागत आहे. मात्र, या उद्योगांमध्ये स्थानिकांना रोजगार मिळत नाही, असा आरोप आमदार किशोर जोरगेवार यांनी केला. दुपारी १२ वाजता गांधी चौकातून मोर्चाला सुरुवात झाली. शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. आंदोलनात कलाकार मल्लारप, जितेश कुळमेथे, वंदना हातगावकर, विश्वजित शाहा, अमोल शेंडे, साहिली येरणे, दुर्गा वैरागडे, तापूष डे, नितीन शाहा, रूपेश कुंदोजवार, विनोद अनंतवार, विलास वनकर, हरमन जोसेफ, नितीन शाहा, तिरुपती कालेगुरवार, आनंद रणशूर, राजेश वर्मा, आदि गिरवेनी, दिनेश इंगळे सहभागी झाले होते.

Web Title: Three agitations erupted on Monday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.