साडे तीन लाखांचा दारुसाठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 05:00 AM2021-06-09T05:00:00+5:302021-06-09T05:00:16+5:30

जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अपर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी अवैध धंद्याविरुद्ध विशेष मोहीम सुरु केली आहे. सोमवारी रामनगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जिवन राजगुरु यांना मिळाली. या माहितीच्या आधारावर ह्युडांई वाहन एमएच ३४ एएम ३४७९ क्रमाकांच्या वाहनातून सहा बॅाक्स मॅक्डवेल नंबर १, बी सेवन एक बॅाक्स, रॅायल स्टॅग व्हिस्की यासह तीन लाख ७३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन दोघांना अटक केली.

Three and a half lakh liquor seized | साडे तीन लाखांचा दारुसाठा जप्त

साडे तीन लाखांचा दारुसाठा जप्त

Next
ठळक मुद्देदोघांना अटक : रामनगर पोलिसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : रामनगर पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारावर नागपूर-चंद्रपूर मार्गावर कारवाई करुन चारचाकी वाहनातून विदेशी दारुसह तीन लाख ७६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सोमवारी केलेल्या या कारवाईत दोघांना अटक करण्यात आली. अशिष देवेन सिंग (३२) रा. जटपुरा गेट, चंद्रपूर, अंकूश रा. जटपुरा गेट असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. 
  जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अपर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी अवैध धंद्याविरुद्ध विशेष मोहीम सुरु केली आहे. सोमवारी रामनगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जिवन राजगुरु यांना मिळाली. या माहितीच्या आधारावर ह्युडांई वाहन एमएच ३४ एएम ३४७९ क्रमाकांच्या वाहनातून सहा बॅाक्स मॅक्डवेल नंबर १, बी सेवन एक बॅाक्स, रॅायल स्टॅग व्हिस्की यासह तीन लाख ७३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन दोघांना अटक केली. ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कमलेश जयस्वाल यांच्या नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक जीवन राजगुरु, राजू आसुटकर, राजनारायण ठाकूर, पोलीस शिपाई योगेश सोनवणे यांनी केली. 

घुग्घुसमध्ये देशी-विदेशी दारूसह मुद्देमाल जप्त
घुग्घुस : गस्तीदरम्यान एका कारमधून एक लाख ५४ हजार ४०० रुपयांची देशी दारू, आठ लाखांची कार व एक दहा हजारांचा मोबाइल, असा एकूण ९ लाख ६४ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल घुग्घुस पोलिसांकडून जप्त करण्यात आला. यामध्ये एका आरोपीला अटक करण्यात आली. ही कारवाई बेलोरा एसएसटी पाईंटवर करण्यात आली. आदर्श बंडू पाटील (रा. कन्नमवार वॉर्ड, बल्लारपूर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. सोमवारी सायंकाळी घुग्घुस पोलिसांनी वर्धा नदीच्या बेलोरा एसएसटी पाईंटवर नाकेबंदी करून एम.एच. ३१ एफई ९४६२या वाहनाला अडवून झडती घेतली असता त्यात दारु आढळून आली.

 

Web Title: Three and a half lakh liquor seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.