३० किलोमीटरच्या प्रवासासाठी तीन बसेस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:18 AM2021-07-12T04:18:07+5:302021-07-12T04:18:07+5:30
संदीप बांगडे सिंदेवाही : चंद्रपूर जिल्ह्यातील आगाराच्या नवीन बसने प्रवास करणे त्रासदायक झाल्याचे अनुभव शनिवारी प्रवाशांना आला. वारंवार ...
संदीप बांगडे
सिंदेवाही : चंद्रपूर जिल्ह्यातील आगाराच्या नवीन बसने प्रवास करणे त्रासदायक झाल्याचे अनुभव शनिवारी प्रवाशांना आला. वारंवार बसेस बंद पडत असल्याने ३० किलोमीटरचा प्रवास प्रवाशांना चक्क तीन वेळा बस बदलून करावा लागला.
वरोरा आगाराची एमएच ३१ एफसी ३६९५ या क्रमांकाची पहिली बस काही कारणाने सरडपारजवळ बंद पडली. चंद्रपूर बसस्थानकावरून शनिवारी दुपारी चंद्रपूर ते मुडझा बसने सिंदेवाही येथील प्रवासी बसले. ती दुसरी बससुद्धा प्रवासादरम्यान मूल येथील रेल्वे गेटजवळ बंद पडली. त्यानंतर त्या बसमधील प्रवाशांना प्रवासाकरिता एमएच ४० वाय ५२४३ या क्रमांकाच्या चंद्रपूर - ब्रह्मपुरी या बसमध्ये बसविण्यात आले. ती बससुद्धा सरडपाळजवळ आधीच बंद असलेल्या पहिल्या बसच्या काही अंतरावर येऊन बस बंद पडली. बसमधील प्रवासी रस्त्यावर ताटकळत उभे होते. त्या बसमधील प्रवासी पुन्हा उतरून चंद्रपूर ते साकोली जाणाऱ्या तिसऱ्या बसमध्ये बसले. काही प्रवासी नंतर मागून आलेल्या चंद्रपूर ते ब्रह्मपुरी या बसने पुढील प्रवासाकरिता निघाले. प्रवाशांना ३० किलोमीटरच्या अंतरात तीन बसेस बदलाव्या लागल्या.
110721\img-20210710-wa0051.jpg
नादुरुस्त बस मधील प्रवासी वाट बघताना रस्त्यावर ताटकळत उभे राहिले