रेल्वेच्या धडकेत तीन चितळ ठार

By राजेश भोस्तेकर | Published: May 20, 2024 12:01 PM2024-05-20T12:01:11+5:302024-05-20T12:02:00+5:30

गोंदिया - बल्लारशाह रेल्वे रुळावरील घटना

Three Chital killed in train collision | रेल्वेच्या धडकेत तीन चितळ ठार

रेल्वेच्या धडकेत तीन चितळ ठार

चंद्रपूर :;ब्रह्मपुरी वन विभागमधील तळोधी वनपरिक्षेत्रातील तळोधी नियतक्षेत्र गंगासागर हेटी बिट कक्ष क्रमांक ९० मध्ये गोंदिया - बल्लारशाह रेल्वे रुळालगत रेल्वेच्या धडकेमध्ये तीन चितळ्यांचे मृत्यू झाल्याची घटना रविवारी रात्री १० वाजता उघडकीस आली. 

नागभीडकडून चंद्रपूरकडे जाणाऱ्या रेल्वे इंजिनच्या धडकेने घटना घडल्याची  माहिती मिळताच रेल्वे पोलीस व तळोधी बाळापूर वनपरिक्षेत्रातील कर्मचारी स्वाब संस्थेचे सदस्य घटनास्थळी पोहोचले. मोक्का पंचनामा करून रात्री दोन वाजता तिन्ही मृत चितळांना वनविभागाच्या  सावरगाव येथील रोपवाटिकेमध्ये आणले. सोमवारी सकाळी शवविच्छेदन करण्यात आले. यापैकी एक दीड ते दोन वर्षे वयाचा तर दोन चितळ अंदाजे तीन ते साडेतीन वर्षे वयाचे असून त्यापैकी एक चितळ हे गर्भावस्थेत असल्याचे आढळून आले. यावेळी तळोधी बा.चे वनपरिक्षेत्र अधिकारी अरुप कंन्नमवार, तळोधीचे क्षेत्र सहाय्यक अरविंद मने, वनरक्षक राजेंद्र भरणे, वनरक्षक पंडित मेकेवाळ, स्वाब संस्थेचे अध्यक्ष यश कायरकर, जिवेश सयाम सदस्य सर्पमित्र, व इतर सदस्य उपस्थित होते.
      
या रेल्वे रुळामुळे वन्यप्राण्यांचा जीव धोक्यात

विशेष म्हणजे गोंदिया - बल्लारशाह रेल्वे लाईन ही ताडोबा आणि ब्रह्मपुरी वन विभागाच्या जंगलामधूनच गेलेली असल्यामुळे या मार्गावर सतत  वन्यजीव मृत पावल्याच्या घटना घडतात. यामध्ये चिचपल्ली- मुल- नागभीड- तळोधी - सिंदेवाही या परिसरामध्ये वाघ, अस्वल, बिबट आणि सांबर, चितळ, नीलगाय, रानगवा, अशा पद्धतीचे वन्यजीव सतत मरत असतात. त्यामुळे जंगलातून चालणाऱ्या रेल्वेची वेग मर्यादा ही कमी असावी. तसेच दोन्ही रेल्वे ट्रॅकच्या बाजूला जाळीचे कुंपण केलेले असावे जेणेकरून या प्रकारच्या दुर्दैवी घटना घडणार नाही, सोबतच रेल्वे विभागावर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात यायला हवा. जेणेकरून अशा दुर्दैवी घटना कमी करता येतील.
- यश कायरकर, अध्यक्ष, 'स्वाब नेचर केअर फाउंडेशन.'

Web Title: Three Chital killed in train collision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.