गोंडपिपरी तालुक्यातील तीन सिंचन प्रकल्प रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:21 AM2021-06-06T04:21:50+5:302021-06-06T04:21:50+5:30

गोंडपिपरी : राजुरा मतदारसंघ हा आदिवासीबहुल, नक्षलप्रभावित, जंगलव्याप्त व दुर्लक्षित, दुर्गम भागांनी वेढलेला आहे. या क्षेत्रातील तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांना ...

Three irrigation projects in Gondpipri taluka stalled | गोंडपिपरी तालुक्यातील तीन सिंचन प्रकल्प रखडले

गोंडपिपरी तालुक्यातील तीन सिंचन प्रकल्प रखडले

googlenewsNext

गोंडपिपरी : राजुरा मतदारसंघ हा आदिवासीबहुल, नक्षलप्रभावित, जंगलव्याप्त व दुर्लक्षित, दुर्गम भागांनी वेढलेला आहे. या क्षेत्रातील तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांना सिंचनाची सोय निर्माण करण्यासाठी राजुरा तालुक्यातील भेंडारा मध्यम प्रकल्पाला सन १९९० मध्ये मंजुरी मिळाली व डोंगरगाव मध्यम प्रकल्पाला सन १९७७ मध्ये मंजुरी मिळाली. गोंडपिपरी तालुक्यातील सोनापूर-टोमटा उपसा सिंचन योजनेला सन १९९१ मध्ये मंजुरी मिळाली आहे. या सर्व प्रकल्पांच्या कामांना जवळपास ३० वर्षे लोटूनही प्रकल्पाची कामे पूर्णत्वास आलेली नाही.

शेतकऱ्यांसाठी नवसंजीवनी ठरणाऱ्या या तिन्ही प्रकल्पांची रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी ५० कोटी रुपये निधी तातडीने उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी आमदार सुभाष धोटे यांनी मुंबई येथे राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांची भेट घेऊन केली आहे. अद्ययावत परिस्थितीचा आढावा घेतला असता निधीअभावी प्रकल्पांची कामे पूर्णत्वास आली नसल्याबाबतची माहिती समोर आली. भेंडारा प्रकल्पाची बरीच कामे अपूर्ण आहेत. सोनापूर टोमटा उपसा सिंचन योजनेच्या वितरण व्यवस्था कालव्यांची कामे अपूर्ण आहेत. तसेच डोंगरगाव मध्यम प्रकल्पाची बरीच कामे अपूर्ण आहेत. ३० वर्षांच्या कालावधीनंतरही सदर प्रकल्पाचे पाणी परिसरातील शेतकऱ्यांना मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये शासनाच्या धोरणाविषयी असंतोष पसरत आहे. सदर प्रकल्पाची उर्वरित कामे तातडीने पूर्ण करून शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. येथे सिंचन सुविधेअभावी स्थानिक शेतकऱ्यांना निसर्गाच्या पावसावर अवलंबून शेती करावी लागते. अनेकदा नापिकीला सामोरे जावे लागते. उत्पादन खर्चसुद्धा निघत नसल्याने शेतक-यांना हलाखीचे जीवन जगावे लागत आहे.

निधीअभावी रखडलेल्या भेंडारा मध्यम प्रकल्प, डोंगरगाव मध्यम प्रकल्प व सोनापूर टोमटा उपसा सिंचन योजना या प्रकल्पांची कामे पूर्ण करण्यासाठी ५० कोटी रु. निधी उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार सुभाष धोटे यांनी राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांना निवेदनाद्वारे केली आहे.

बॉक्स

प्रकल्प पूर्ण झाले तर सुजलाम् सुफलाम्

हे रखडलेले तीनही प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण झाल्यास क्षेत्रात मोठ्या प्रमाणात सिंचन सुविधा उपलब्ध होतील. शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी होतील. यातून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल. यासाठी या तीनही प्रकल्पांचे काम युद्धपातळीवर प्राधान्य देऊन पूर्ण करण्याची गरज आमदार सुभाष धोटे यांनी व्यक्त केली.

===Photopath===

050621\screenshot_2021_0604_184552.png

===Caption===

सुभाष धोटे फोटो

Web Title: Three irrigation projects in Gondpipri taluka stalled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.