विविध अपघातात तिघे ठार ; दोन जखमी
By admin | Published: January 20, 2015 11:10 PM2015-01-20T23:10:34+5:302015-01-20T23:10:34+5:30
तीन वेगवेगळ्या अपघातात तिघे जण ठार तर, तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. गडचांदूर-राजुरा मार्गावर टिप्पलने दुचाकीला धडक दिली. यात आशिष विक्रम मडावी (१९) घटनास्थळीच ठार झाला.
चंद्रपूर : तीन वेगवेगळ्या अपघातात तिघे जण ठार तर, तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. गडचांदूर-राजुरा मार्गावर टिप्पलने दुचाकीला धडक दिली. यात आशिष विक्रम मडावी (१९) घटनास्थळीच ठार झाला. दुसऱ्या घटनेमध्ये गडचिरोलीवरून चंद्रपूरकडे दुध घेऊन येणाऱ्या वाहनाने धडक दिल्याने दुचाकीस्वार सिद्धार्थ वाळके ठार झाला. तर तिसऱ्या घटनेत चंद्रपूर बल्लारपूर रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू झाला.
राजुरा-गडचांदूर मार्गावरील रेल्वे क्रासींगजवळ टिप्पर एमएच ३४ एम ५४७९ ने मोटरसायकल एमएच ३४ व्ही ७२२१ ला धडक दिली. यात दुचाकीवरील आशिष विक्रम मडावी (१९) रा. आवारपूर याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. त्याचा सहकारी देवानंद राजूरकर रा.चंद्रपूर हा गंभीर जखमी झाला. घटनेनंतर वाहनचालक फरार झाला. घटनेची माहिती मिळताच वाहतूक शिपाई राजिक शेख व त्याचे सहकारी घटनास्थळी पोहोचले.
दुसऱ्या घटनेत पुणे येथील एका खासगी कंपनीमध्ये नोकरीवर असलेल्या सिध्दार्थ वाळके याला शासकीय नोकरी लागल्यामुळे तो बोरचांदली येथे १९ नोव्हेंबर रोजी जाण्यासाठी मूल येथे आला. गावाला जाण्यासाठी कोणतेही वाहन नसल्याने सिध्दार्थने गुलशन वाळके याला दुचाकी वाहन घेवून बोलावले. गुलशन वाळके तथा लखन मेश्राम हे दोघेही दुचाकी एम एच ३३ ए टी ३५४९ हे मूल येथे आले आणि सिध्दार्थ वाळकेला घेऊन बोरचांदलीकडे निघाले.
दरम्यान, गडचिरोलीवरून चंद्रपूरकडे दूध घेऊन जाणाऱ्या टाटा एस एम एच ३३जी १५७० ने धडक दिली. यात सिध्दार्थ वाळके (३२) रा. बोरचांदली याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर गुलशन वाळके (२९) व लखन मेश्राम (२२) गंभीर जखमी झाले. मूल पोलिसांनी वाहन चालकावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक जी. आर. विखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार श्रीराम कुमरे, पोलीस शिपार्ई सुनील मेश्राम करीत आहे. (नगर प्रतिनिधी)