ट्रकला ओव्हरटेक करणे जीवावर बेतले, तिघे जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2022 11:48 AM2022-02-17T11:48:19+5:302022-02-17T11:53:14+5:30

शंकरपट पाहून दुचाकीने घरी लवकर जाण्याच्या घाईत ते एका ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असताना त्यांना समोरून येणारा ट्रक दिसला नाही. या ट्रकची त्यांच्या दुचाकीला धडक बसली. यात तिघांचाही जागीच मृत्यू झाला.

Three killed on the spot as truck hits bike | ट्रकला ओव्हरटेक करणे जीवावर बेतले, तिघे जागीच ठार

ट्रकला ओव्हरटेक करणे जीवावर बेतले, तिघे जागीच ठार

Next
ठळक मुद्देदोन दिवसांपूर्वीच झाले होते लग्न : चंद्रपूर जिल्ह्यातील घटना

सिंदेवाही (चंद्रपूर) : तालुक्यातील सरटपार येथील शंकरपटावरून सिंदेवाहीकडे दुचाकीने येत असताना समोरून येणाऱ्या ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत तिघांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मुरमाडी गावाजवळील मातोश्री राइस मिलजवळ बुधवारी (दि. १६) सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास घडली. मृतांमध्ये दोनच दिवसांपूर्वी विवाह झालेल्या युवकाचा समावेश आहे.

राकेश रामदास मेश्राम (१६, रा. सिंदेवाही), विवेक राजेंद्र नाने (११, रा. मोठेगाव), रोशन विठ्ठल मेश्राम (२५, रा. कच्चेपार) अशी मृतांची नावे आहेत. हे तिघेही सरटपार येथे शंकरपट बघण्यासाठी गेले होते. शंकरपट पाहून दुचाकीने घरी लवकर जाण्याच्या घाईत ते एका ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असताना त्यांना समोरून येणारा ट्रक दिसला नाही. या ट्रकची त्यांच्या दुचाकीला धडक बसली. यात तिघांचाही जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर ट्रकचालक फरार झाला आहे. अपघाताचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक योगेश घारे करत आहेत.

लग्नघरी शाेककळा...

या घटनेतील मृत रोशन विठ्ठल मेश्राम यांचे १४ फेब्रुवारीलाच लग्न झाले होते. रोशनच्या लग्नासाठी आलेले पाहुणे परतलेही नव्हते. तो आपल्या दोन नातेवाइकांसोबत शंकरपट पहायला गेला होता आणि ही दुर्दैवी घटना घडली. या दु:खद घटनेची माहिती कळताच रोशनच्या कच्चेपार येथील घरी शोककळा पसरली. गावातील अनेकांनी त्याच्या घरी धाव घेत हळहळ व्यक्त केली.

Web Title: Three killed on the spot as truck hits bike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.