सेवानिवृत्त मुख्याध्यापकाच्या वाहनातून उडविले तीन लाख ६० हजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:31 AM2021-02-09T04:31:22+5:302021-02-09T04:31:22+5:30
सेवानिवृत्त मुख्याध्यापक महादेव गणपत ढोरे (६२), रा. मालवीय वाॅर्ड यांनी भारतीय स्टेट बँकेमध्ये आपल्या पेन्शन खात्यातून वाशिम येथील आपल्या ...
सेवानिवृत्त मुख्याध्यापक महादेव गणपत ढोरे (६२), रा. मालवीय वाॅर्ड यांनी भारतीय स्टेट बँकेमध्ये आपल्या पेन्शन खात्यातून वाशिम येथील आपल्या मुलीला भूखंड घेण्याकरिता ३ लाख ६० हजार रुपये काढले. रोख रक्कम, चेकबुक व बँक पासबुक रूमालात बांधून दुचाकी वाहनाच्या डिकीमध्ये ठेवून घराकडे निघाले. काही अंतरावर दुचाकी रस्त्याच्या कडेला उभी करून बाजूला लघुशंकेसाठी गेले. दरम्यान, वाहनाची किल्ली वाहनावर लागलेली होती. ही संधी साधून चोरट्यांनी डाव साधला. त्या किल्लीने सहज डिकी उघडून चोरट्यांनी रुमालात बांधलेली ३ लाख ६० हजार रुपये घेऊन पोबारा केला. याप्रकरणी वरोरा पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भादंविच्या ३७९ कलमाने गुन्हा नोंदविला आहे.
चार घरफोड्यांनंतर मोठी चोरी
वरोरा शहरात आठ दिवसांत दिवसा चार घरफोड्या झाल्या. त्यानंतर ही सर्वात मोठी चोरी आहे. चारपैकी तीन घरफोड्या भरदिवसा झाल्या. मात्र, वरोरा पोलिसांच्या हाती अद्याप एकही आरोपी लागला नाही.