बनावट सोन्याचे दागिने विकताना तिघांना अटक
By admin | Published: May 6, 2017 12:36 AM2017-05-06T00:36:07+5:302017-05-06T00:36:07+5:30
जमिनीचे खोदकाम करीत असताना तांब्याच्या लोट्यामध्ये सोन्याचे दागीन मिळाल्याचे सांगून विक्रीक रण्याकरिता फिरत असताना...
मूल पोलिसांची कारवाई : गुप्त माहितीच्या आधारावर सापळा
लोकमत न्यूज नेटवर्क
मूल: जमिनीचे खोदकाम करीत असताना तांब्याच्या लोट्यामध्ये सोन्याचे दागीन मिळाल्याचे सांगून विक्रीक रण्याकरिता फिरत असताना मूल पोलिसांनी दोन पुरुषांसह एका महिला शुक्रवारी अटक केली आहे. राजू उर्फे प्रभूदयाल किसन राठोड (३५) सीताराम उर्फ हिरा देविलाल भाट उर्फ सोलंकी (२४) व लच्छमी राजू उर्फ प्रफुदयाला राठोड (३०) रा. पट्टा, ता. झाशी जि. झाशी (उ. प्र.) असे आरोपींचे नाव आहे.
मूल पोलिसांना बनावट सोन्याची विक्री होत असल्याची गुप्त माहिती शुक्रवारी मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला. यावेळी राजू उर्फ प्रभूदयाल किसन राठोड (३५), सीताराम उर्फ हिरा देविलाल भाट उर्फ सोलंकी (२४) व लच्छमी राजू उर्फ प्रभूदयाल राठोड (३०) रा. पट्टा जि. झाशी (उ.प्र.) हे येथील आर्य वैश्य समाज मंदिराजवळ मिलिंद भाऊजी रामटेके यांच्याशी ५ लाख १० हजार रुपयांमध्ये १ किलो सोन्याचे दागिन्याचा सौदा सुरु केला. तेवढ्यात पोलीस तेथे पोहोचले. त्यांनी तिन्ही आरोपींना अटक केली. मूल पोलिसांनी आरोपींविरोधात भांदवि कलम ४२०, ४१९ (३४) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
गळफास घेऊन
युवकाची आत्महत्या
भद्रावती : शहरातील शिवाजी नगर येथील युवकाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी घडली.
अमोल दिलीप चिंगलवार (३०) रा. शिवाजी नगर, रा. भद्रावती असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे. त्याने घरातील नातेवाईक बाहेरगावी गेल्याचे पाहून शुक्रवारी पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहे.