चितळ शिकारप्रकरणी तीन जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 11:16 PM2018-05-14T23:16:38+5:302018-05-14T23:16:38+5:30

तालुक्यातील चितेगाव येथील तलावात तारांचा फास लावून चितळाची शिकार केली. त्यानंतर त्याची विक्री करणाऱ्या तीन जणांना पर्यावरण मित्रांच्या सतर्कतेमुळे अटक करण्यात आली. ही कारवाई सोमवारी करण्यात आली.

Three people arrested for Chital hunting | चितळ शिकारप्रकरणी तीन जणांना अटक

चितळ शिकारप्रकरणी तीन जणांना अटक

Next
ठळक मुद्देचितेगावची कारवाई : मांस विक्री करताना पकडले

लोकमत न्यूज नेटवर्क
मूल : तालुक्यातील चितेगाव येथील तलावात तारांचा फास लावून चितळाची शिकार केली. त्यानंतर त्याची विक्री करणाऱ्या तीन जणांना पर्यावरण मित्रांच्या सतर्कतेमुळे अटक करण्यात आली. ही कारवाई सोमवारी करण्यात आली.
दादाजी वैतागू भोयर, गंगाधर दादाजी भोयर रा. मरेगाव व देवराव बापूजी मांदाडे रा. चिमढा असे आरोपींची नावे आहेत. सावली वनपरिक्षेत्रातील राजोली क्षेत्रातील चितेगाव येथील तलावात तारेचा फास लावून चितळाची शिकार करण्यात आली. शिकारीनंतर त्या चितळाचे विक्रीसाठी हिस्से करण्यात आले. त्यानंतर विक्री सुरू असताना आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणी प्राणी मित्राच्या सहकार्यातून अटक करण्यात आली.
ही कारवाई क्षेत्र सहाय्यक व्ही. सी. धुर्वे, वनरक्षक एस. एल. नन्नावरे यांनी पर्यावरण मित्र उमेशसिंग झिरे, तन्मय झिरे व मनिष रक्षमवार यांच्या सहकार्याने केली.

Web Title: Three people arrested for Chital hunting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.