लाच प्रकरणात तिघांना करावास

By परिमल डोहणे | Published: September 17, 2023 02:11 AM2023-09-17T02:11:12+5:302023-09-17T02:12:10+5:30

कंत्राटदाराकडून लाच घेतल्याच्या आरोपाखाली तत्कालीन तळोधी रेंज कार्यालयातील तीन्ही आरोपींना न्यायालयाने शिक्षा ठोठावली आहे.

Three people jailed in bribery case | लाच प्रकरणात तिघांना करावास

लाच प्रकरणात तिघांना करावास

googlenewsNext

चंद्रपूर :  कंत्राटदाराकडून लाच घेतल्याच्या आरोपाखाली तत्कालीन तळोधी रेंज कार्यालयातील तीन्ही आरोपींना न्यायालयाने शिक्षा ठोठावली आहे. वनपाल विठोबा उष्टू वैरागडे (६५), लिपीक यशवंत त्र्यंबक गौरशेट्टीवार (६१), चौकीदार जितेंद्र रमेश डोर्लिकर (४४) अशी आरोपींची नावे आहेत.

याबाबत माहिती आशी की, तक्रारदार योगेंद्र मधुकर बन्सोड यांना आरोपी गौरशेट्टीवार व वैरागडे यांनी वाढोणा येथील महसूलच्या जागेवर गिट्टी, बोल्डर व मुरूम उत्खननानाकरिता लिज व नाहरकत प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी  पाच हजार रूपयांची लाच मागितली होती.वैरागडे यांनी स्वतः लाच स्विकारून लाच रकमेतील वाटा गौरशेट्टीवार यांना देण्यासाठी तक्रारदार यांना डोर्लिकर यांचेकडे देण्यास सांगितले.

तिन्ही आरोपींनी लोकसेवक पदाचा दुरूपयोग करून लाच स्विकारली व त्यांना रंगेहात पकडण्यात आले.याप्रकरणी नागभीड पोलिस ठाण्यात १८ नोव्हेंबर २०१५ रोजी कलम ७, १२,१३(१) ड, १५ सहकलम १३, (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणाचा निकाल जिल्हा न्यायालयाने शनिवारी दिला.यात वैरागडे व गौरशेट्टीवार यांना कलम ७ मध्ये पाच वर्षाची सजा व पाच हजार रूपये दंड.दंड न भरल्यास ३ महिने साधा कारावास' कलम १३ (१)(ड), १३(२) मध्ये पाच वर्षाची सजा व पाच हजार रूपये दंड.दंड न भरल्यास ३ महिने साधा कारावास तर डोर्लिकर यास ५ वर्षाची सजा व पाच हजार रूपये दंड,दंड न भरल्यास ३ महिने साधा कारावास अशी शिक्षा सुनावाली आहे.

Web Title: Three people jailed in bribery case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.