रत्नागिरीतील रिफायनरीचे तीन तुकडे; एक युनिट विदर्भात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2022 08:04 AM2022-09-23T08:04:52+5:302022-09-23T08:05:46+5:30

चंद्रपूर जिल्ह्यात तीन दिवसांच्या दौऱ्यावर आलेले श्री पुरी यांच्यासमोर वेदने विदर्भात रिफायनरी प्रकल्प उभारण्याविषयी सादरीकरण केले.

Three pieces of refinery in Ratnagiri; One unit in Vidarbha | रत्नागिरीतील रिफायनरीचे तीन तुकडे; एक युनिट विदर्भात

रत्नागिरीतील रिफायनरीचे तीन तुकडे; एक युनिट विदर्भात

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोकणातील रत्नागिरीत होऊ घातलेला रिफायनरी प्रकल्पाचे त्रिभाजन करून त्यापैकी एक युनिट विदर्भात उभारले जाऊ शकेल, असे संकेत केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी गुरुवारी विदर्भ इकॉनाॅमिक डेव्हलपेंट कौन्सिल (वेद)च्या शिष्टमंडळाशी बाेलताना दिले. परिणामी, बारसू येथे होऊ घातलेल्या रिफायनरी प्रकल्पाला नवे वळण मिळाले आहे. 

चंद्रपूर जिल्ह्यात तीन दिवसांच्या दौऱ्यावर आलेले श्री पुरी यांच्यासमोर वेदने विदर्भात रिफायनरी प्रकल्प उभारण्याविषयी सादरीकरण केले. अंदाजे चार लाख कोटी रुपये गुंतवणुकीच्या या प्रकल्पाची क्षमता वर्षाला ६० दशलक्ष टन (एमटीपीए) आहे. स्थानिक पातळीवर होणारा विरोध लक्षात घेता त्या प्रकल्पाचे प्रत्येकी २० एमटीपीए क्षमतेचे तीन भाग करून त्यापैकी प्रत्येकी एक युनिट रत्नागिरी व नागपूर येथे उभारण्याबाबत विचार होऊ शकेल, असे ना. पुरी यांनी शिष्टमंडळाला सांगितले. यावेळी वेदचे  कोषाध्यक्ष नवीन मालेकर, जे. एस. साळवे, चंद्रपूर एमआयडीसीचे अध्यक्ष मधुसूदन रुंगटा उपस्थित होते.

विदर्भात उद्योगांचा अभाव असला तरी कोळसा खाणी व उद्योगपूरक संसाधनांची मोठी उपलब्धता आहे. त्यामुळे रिफायनरी प्रकल्प विदर्भात उभारणे कसे शक्य आहे, यासंदर्भात आम्ही सखोल अभ्यास करून केंद्रीय पेट्रोलियममंत्री हरदीपसिंग पुरी यांच्यासमोर सादरीकरण केले. विदर्भाची मौलिकता लक्षात घेऊन रिफायनरी प्रकल्प विदर्भात उभारण्याची ग्वाही आम्हाला दिली.     - प्रदीप माहेश्वरी, 
उपाध्यक्ष, विदर्भ इकॉनाॅमिक डेव्हलपेंट कौन्सिल (वेद), नागपूर

२५ हजार रोजगार शक्य 
विदर्भात २० एमटीपीए क्षमतेचा रिफायनरी प्रकल्प उभारल्यास सुमारे दीड लाख कोटींची गुंतवणूक होणार आहे. ही गुंतवणूक विदर्भाच्या विकासासाठी उपयोगी ठरणार आहे. रिफायनरी प्रकल्पामुळे २५ हजार व्यक्तींना थेट, तर एक ते दीड लाख लोकांना अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होणार आहे. वेदने २०२१ मध्ये प्रकल्पाबाबत तत्कालीन पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रकल्प अहवाल व निवेदन  सादर केले होते. त्याच्या प्रती ना. पुरी यांना देत जुन्या प्रस्तावाचे स्मरण केले.

Web Title: Three pieces of refinery in Ratnagiri; One unit in Vidarbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.