चंद्रपुरात कोविडसाठी दररोज तीन हजार एचआरसीटी तपासण्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:27 AM2021-04-17T04:27:35+5:302021-04-17T04:27:35+5:30

चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या प्रचंड वाढली. लक्षणे नसणारे व सौम्य लक्षणे असणारे पॉझिटिव्ह रुग्ण दिवसागणिक ...

Three thousand HRCT checks daily for Kovid in Chandrapur | चंद्रपुरात कोविडसाठी दररोज तीन हजार एचआरसीटी तपासण्या

चंद्रपुरात कोविडसाठी दररोज तीन हजार एचआरसीटी तपासण्या

Next

चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या प्रचंड वाढली. लक्षणे नसणारे व सौम्य लक्षणे असणारे पॉझिटिव्ह रुग्ण दिवसागणिक वाढतच आहेत. चंद्रपूर शहरातही रुग्णसंख्येने धडकी भरविली. शासकीय व खासगी कोविड रुग्णालये फुल्ल झाली. त्यामुळे लक्षणे नसणाऱ्या शहरातील शेकडो नागरिक एचआरटीसी चाचणीसाठी खासगी तपासणी केंद्रांमध्ये प्रचंड गर्दी करीत आहेत. कोरोना निदानासाठी ग्रामीण भागातूनही शेकडो संशयित रुग्ण शहरातील खासगी हॉस्पिटलमध्ये येत आहेत. दररोज सुमारे तीन हजार एचआरटीसी चाचण्या होत असल्याचा अंदाज आहे. चंद्रपूर महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, शहरात डॉ. मानवटकर, डॉ. अल्लूरवार, डॉ. माडूरवार, डॉ. मेहरा हॉस्पिटलला सीटी स्कॅन, एचआरसीटी चाचणी करण्यास परवानगी आहे. दरम्यान, कोरोना प्रतिबंधक उपाययोजना व शासनाच्या नियमांचे पालन करूनच तपासण्या केल्या जात असल्याचा असा दावा मान्यताप्राप्त खासगी हॉस्पिटल्सने केला आहे.

एचआरटीसी टेस्ट म्हणजे नक्की काय?

कोरोना महामारीत एचआरटीसी टेस्ट एवढे महत्त्व का आले, असा प्रश्न पुढे आला आहे. चंद्रपुरातील एका प्रसिद्ध खासगी रेडिओलॉजिस्टने ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, एचआरसीटी टेस्टमध्ये छातीचे स्कॅनिंग केले जाते. यात फुफ्फुसामध्ये न्यूमोनियाचा संसर्ग किती प्रमाणात झाला याचे अचूक निदान होते.

न्यूमोनियातील फरक समजतो

कोरोना झाल्यानंतरचा न्यूमोनिया आणि अन्य न्यूमोनियामध्ये फरक असतो. एचआरटीसी चाचणी केल्यानंतर हा फरक दिसून येतो. त्यामुळे ही चाचणी कोरोना प्रतिबंधासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. एचआरटीसी करण्यासाठी १५ ते २० मिनिटांचा कालावधी लागतो. रिपोर्ट मिळायलाही विलंब होत नाही, अशी माहितीही रेडिओलॉजिस्टने दिली.

परस्पर तपासणी करून होम क्वारंटाईन

कोरोनामुळे अनेकांनी खासगी हॉस्पिटल्समधून परस्पर तपासणी करून घरीच उपचार करणे सुरू केले. संबंधित डॉक्टरांच्या प्रिस्क्रीप्शनशिवाय एचआरटीसी करण्यास परवानगी नाही. मात्र, कोरोनाच्या धास्तीने प्रिस्क्रीप्शनविना ही तपासणी होम क्वारंटाईन होण्याच्या घटना चंद्रपुरात एप्रिल महिन्यात वाढल्याची माहिती पुढे आली.

मनपा आयुक्त म्हणतात...

यासंदर्भात मनपा आयुक्त राजेश मोहिते यांना विचारले असता म्हणाले,

कोविड ९० च्या पार्श्वभूमीवर खासगी हॉस्पिटल्समधून परस्पर एचआरसीटी तपासणी करण्यास प्रतिबंध आहे. कोरोनाची पहिली लाट येण्यापूर्वीच मनपाने चंद्रपुरातील खासगी मान्यताप्राप्त सीटी स्कॅन हॉस्पिटल संचालक डॉक्टरांची बैठक घेण्यात आली. इंडियन मेडिकल असोसिएशन चंद्रपूर शाखेच्या पदाधिकाऱ्यांनाही बोलावण्यात आले. संबंधित डॉक्टरांच्या प्रिस्क्रीप्शनशिवाय एचआरटीसी करू नये व तपासणी अहवाल नियमित सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, हॉस्पिटल्सकडून दररोज अहवाल येत नाही.

Web Title: Three thousand HRCT checks daily for Kovid in Chandrapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.