चंद्रपूरात एका वाघिणीसह दोन बछड्यांचा मृत्यू; विषबाधेचा संशय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2019 10:29 AM2019-07-08T10:29:33+5:302019-07-08T12:11:05+5:30

चिमूर वनपरिक्षेत्र शंकरपूर वनक्षेत्रात मेटेपार गावालगत असलेल्या नाल्याजवळ तीन वाघाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि. ८) सकाळी उघडकीस आली आहे.

Three tigers died in Chandrapur district | चंद्रपूरात एका वाघिणीसह दोन बछड्यांचा मृत्यू; विषबाधेचा संशय

चंद्रपूरात एका वाघिणीसह दोन बछड्यांचा मृत्यू; विषबाधेचा संशय

googlenewsNext
ठळक मुद्देवाघिणीसह दोन बछडे आढळले मृतावस्थेत

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चिमूर वनपरिक्षेत्र शंकरपूर वनक्षेत्रात मेटेपार गावालगत असलेल्या नाल्याजवळ तीन वाघाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि. ८) सकाळी उघडकीस आली आहे. यात एक वाघीण व तिचे दोन बछडे असून ते आठ ते नऊ महिन्याचे आहे.

 याबद्दलची हाती आलेली माहिती अशी, मेटेपार गावालगत असलेल्या तलावाकाठी काहीजण जांभळाच्या झाडावरून जांभळं तोडायला गेले असता त्यांना तेथे वाघिणीसह दोन बछडे मृतावस्थेत आढळले. त्यांनी तात्काळ ही माहिती शंकरपूरच्या पर्यावरणवादी मंडळाच्या अमोद गौरकर या वन्यजीवप्रेमी तरुणाला दिली. अमोद गौरकर यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, जवळच एक चितळ मृतावस्थेत आढळून आले. या चितळाचे दोन पाय तुटलेल्या अवस्थेत होते. त्यामुळे या वाघिणीने व तिच्या बछड्यांनी या मृत चितळाला खाल्ल्याने त्यांना विषबाधा होऊन ते मृत झाले असावेत असा प्राथमिक अंदाज बांधला जातो आहे. ब्रह्मपुरी वनविभागाचे डीएफओ कुलराज सिंग, चिमूरचे वनपरिक्षेत्र अदिकारी चिवंडे घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Web Title: Three tigers died in Chandrapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tigerवाघ