भजनांच्या माध्यमातून गावागावात परिवर्तनवादी कार्य शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 04:15 AM2020-12-28T04:15:34+5:302020-12-28T04:15:34+5:30

फोटो : जंगलू दरेकर यांचा सत्कार करताना उपस्थित पाहुणे. गोवरी : राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराजांनी आपल्या हिंदी, मराठी ...

Through bhajans, revolutionary work is possible in villages | भजनांच्या माध्यमातून गावागावात परिवर्तनवादी कार्य शक्य

भजनांच्या माध्यमातून गावागावात परिवर्तनवादी कार्य शक्य

Next

फोटो : जंगलू दरेकर यांचा सत्कार करताना उपस्थित पाहुणे.

गोवरी : राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराजांनी आपल्या हिंदी, मराठी भजनांच्या माध्यमातून जनतेला जागृत करण्याचे महान कार्य केले. त्यांच्या भजनात सांगितलेली अध्यात्म आणि विज्ञानाची योग्य सांगड लक्षात घेऊन आपण गावात एकतेचा सेतू मजबूतपणे बांधावा. भजनांच्या तात्त्विक कार्यस्फुर्तीने प्रेरणा घेत गावात श्रमदान, स्वच्छता अभियान , अंधश्रध्दा निर्मुलनाचे महत्त्वाचे कार्य सामुदायिक पध्दतीने करावेत. भजनांतील संतवाणीने अंतरंगी रंगून ग्रामसेवेच्या कार्यात उत्स्फुर्तपणे जो रंगतो तोच खरा भजनकरी असतो , असे मत ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांनी केले.

राजुरा तालुका श्रीगुरूदेव सेवा मंडळ, राष्ट्रसंत विचार साहित्य परिषद आणि गोवरीच्या ग्रामस्थांच्या वतीने हनुमान मंदिर सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी राजुरा तालुका सेवाधिकारी ॲड. राजेंद्र जेनेकर,, गोवरीचे ज्येष्ठ भजन गायक जंगलू दरेकर, उर्जानगर श्रीगुरूदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष मुर्लिधर गोहणे, महादेव दरेकर, भाऊराव बेदरकर आदींची उपस्थिती होती.

प्रास्तविक शंकर दरेकर यांनी केले. ॲड . जेनेकर यांनी तालुक्यातील श्रीगुरूदेव सेवा मंडळाच्या कार्याचा आढावा घेतला. मुर्लिधर गोहणे, ज्योती दरेकर यांनीही समयोचित विचार मांडले. याप्रसंगी सेवा कार्याबद्दल ज्येष्ठ भजनगायक जंगलू दरेकर यांचा श्रीगुरूदेव सेवा मंडळातर्फे मानवस्त्र देऊन सत्कार करण्यात आला. तर दरेकर परिवाराच्या वतीने ग्रामगीता ग्रंथाचे वितरण करण्यात आले. संचालन विलास उगे यांनी केले. कार्यक्रमाला प्रा. श्रावण बानासुरे , भास्कर लोहे, देवराव कोंडेकर, गणेश दरेकर, महादेव हुलके, जानबाजी गांवडे आदी प्रचारक मंडळीची उपस्थिती होती .

Web Title: Through bhajans, revolutionary work is possible in villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.