चंद्रपूर महाऔष्णिक केंद्राच्या प्रवेशद्वाराजळ आला ‘वाघोबा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2022 07:57 PM2022-02-15T19:57:13+5:302022-02-15T19:57:44+5:30

Chandrapur News चंद्रपूर महाऔष्णिक केंद्रात जाणाऱ्या मार्गावरील एका प्रवेशद्वारासमोर एक वाघ आला. त्या ठिकाणी त्याने चांगली भ्रमंतीही केली. हा प्रकार सोमवारी रात्रीच्या सुमारास घडला.

Tiger came near entrance of Chandrapur meteorological station | चंद्रपूर महाऔष्णिक केंद्राच्या प्रवेशद्वाराजळ आला ‘वाघोबा’

चंद्रपूर महाऔष्णिक केंद्राच्या प्रवेशद्वाराजळ आला ‘वाघोबा’

googlenewsNext

चंद्रपूर : येथील राष्ट्रवादी नगर परिसरातील चंद्रपूर महाऔष्णिक केंद्रात जाणाऱ्या मार्गावरील एका प्रवेशद्वारासमोर एक वाघ आला. त्या ठिकाणी त्याने चांगली भ्रमंतीही केली. हा प्रकार सोमवारी रात्रीच्या सुमारास घडला. यावेळी काही वाहनचालक वाहनासह तिथे होते. त्यांनी वाघाचा व्हिडिओ काढून सोशल मीडियावर व्हायरलही केला.

हा वाघ जंगलातून चंद्रपूर-नागपूर मार्गावरील राष्ट्रवादी नगर परिसरातील चंद्रपूर वीज केंद्राच्या प्रवेशद्वाराजवळ आला. काही वेळ तो त्याच ठिकाणी इकडून तिकडे फिरत राहिला. काही वेळानंतर तो जंगलाच्या दिशेने निघून गेला. यावेळी काही वाहनचालक तिथे उपस्थित होते. त्यांनी रात्रीच्या वेळीची वाघाची ही भ्रमंती आपल्या मोबाइलमध्ये टिपली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याची माहिती वनविभागाला मिळाल्यानंतर वनविभागाने त्या परिसरात गस्त सुरू केली आहे, अशी माहिती चंद्रपूरचे वनपरिक्षेत्र कारेकार यांनी दिली.

Web Title: Tiger came near entrance of Chandrapur meteorological station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tigerवाघ