वर्दळीच्या इको पार्कजवळ आढळले वाघाचे पगमार्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:19 AM2021-07-02T04:19:45+5:302021-07-02T04:19:45+5:30
इको पार्क, कर्मवीर महाविद्यालय, पंचायत राज, उपजिल्हा रुग्णालय व चरखा संघ या परिसरात मागील दोन वर्षापासून अस्वलाची भ्रमंती सुरू ...
इको पार्क, कर्मवीर महाविद्यालय, पंचायत राज, उपजिल्हा रुग्णालय व चरखा संघ या परिसरात मागील दोन वर्षापासून अस्वलाची भ्रमंती सुरू राहत असल्याचे आजवर दिसून आले आहे. त्याच्यात भर म्हणजे आता वाघाचे पगमार्क दिसल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. वनविभागाचे कर्मचारी दोन दिवसांआड अस्वलाला हाकलून लावत असतात. कर्मवीर महाविद्यालयाच्या मैदानावर दररोज सकाळ व सायंकाळी फिरायला व व्यायाम करण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक जात असतात.
इको पार्कसमोरील खुल्या मैदानातून असलेल्या मार्गाचा वापर उपजिल्हा रुग्णालयामागील रहिवासी नागरिक नेहमी करतात. मात्र या परिसरात रात्री आलेला वाघ पुन्हा परत येण्याची शक्यता नाकारता येत नाही. या परिसरातील सर्व नागरिकांनी या मार्गाचा वापर अंधार पडल्यानंतर करू नये व कोणत्याही वन्यप्राण्याची चाहूल लागताच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना याची त्वरित माहिती द्यावी, असे आवाहन वनविभागाने केले आहे.
बॉक्स
अस्वलाचे येणे नेहमीचेच
वनविभाचे क्षेत्र सहायक खनके व संजीवन पर्यावरण संस्थेचे अध्यक्ष उमेशसिंह झिरे व सदस्य व वनरक्षक सुभाष मरसकोल्हे हे रोज रात्री गस्त घालत असतात. अस्वल असल्यास फटाके फोडून अस्वलाला जंगलाच्या दिशेने परतवतात.