पळसगाव शिवारात वाघाच्या पायांचे ठसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:33 AM2021-09-08T04:33:38+5:302021-09-08T04:33:38+5:30

सध्या शेतात निंदण, खुरपणी, डवरणी, भाजीपाला लागवड तसेच काही शेतकरी तर शेताची राखणी करण्यासाठी शेतात जागलदेखील करत आहेत. वाघाच्या ...

Tiger footprints in Palasgaon Shivara | पळसगाव शिवारात वाघाच्या पायांचे ठसे

पळसगाव शिवारात वाघाच्या पायांचे ठसे

googlenewsNext

सध्या शेतात निंदण, खुरपणी, डवरणी, भाजीपाला लागवड तसेच काही शेतकरी तर शेताची राखणी करण्यासाठी शेतात जागलदेखील करत आहेत. वाघाच्या पायांचे ठसे दिसल्यामुळे शेतकरी व शेतमजुरांमध्ये भीती निर्माण झाली आहे. या परिसरात नेहमीच डुकरांचा धुमाकूळ असतो. वाघ अन्नाच्या शोधात त्यांच्या मागे आला असावा, असा अंदाज शेतकरीवर्गाचा आहे. शेतकऱ्यांनी याची माहिती वन विभागाला दिली. वन विभागाचे अधिकारी क्षेत्र सहाय्यक बी. टी. पुरी व वनरक्षक एल. आर. प्रतापगिरवार यांनी शिवाराला भेट देऊन चौकशी केली. परिसरातील शेतकऱ्यांनी उशिरापर्यंत शेतात थांबू नये. शेतात जाताना - येताना व शेतीची कामे करताना नेहमी सावध राहावे, अशा सूचना क्षेत्र सहाय्यक बी. टी. पुरी यांनी शेतकऱ्यांना दिल्या आहेत.

Web Title: Tiger footprints in Palasgaon Shivara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.