भद्रावती तालुक्यात पट्टेदार वाघाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2021 14:50 IST2021-11-11T12:53:22+5:302021-11-11T14:50:43+5:30
चंदनखेडा रोडवरील वायगाव येथील रणदिवे यांच्या धानशेतात पट्टेदार वाघाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. शेतातील कुंपणात लावलेल्या विद्युत प्रवाहामुळे या वाघाचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

भद्रावती तालुक्यात पट्टेदार वाघाचा मृत्यू
चंद्रपूर : भद्रावती तालुक्यात वाघाचामृत्यू झाला आहे. चंदनखेडा-वायगाव रोडवरील रणदिवे नामक शेतकऱ्याच्या शेतात या वाघाचा मृतदेह आढळला.
भद्रावती तालुक्यात चंदनखेडा रोडवरील धानशेतात एका पट्टेदार वाघ मृतावस्थेत आढळून आला आहे. मृत वाघ अंदाजे ३ वर्षांचा असण्याची शक्यता आहे. या वाघाचा मृत्यू शेतातील कुंपणात लावलेल्या विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने झाला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.