चंद्रपूर जिल्ह्यातील सिरणा नदीच्या पात्रात आढळला पट्टेदार वाघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2019 11:30 AM2019-11-06T11:30:00+5:302019-11-06T11:31:04+5:30

भद्रावती तालुक्यातील जुना कुनाडा येथील सिरणा नदीजवळ दगडाच्या फटीमध्ये पट्टेदार वाघ अडकला असल्याची माहिती बुधवारी सकाळी नागरिकांना होताच या परिसरात नागरिकांनी एकच गर्दी केली.

A tiger found in the river Siran river in Chandrapur district | चंद्रपूर जिल्ह्यातील सिरणा नदीच्या पात्रात आढळला पट्टेदार वाघ

चंद्रपूर जिल्ह्यातील सिरणा नदीच्या पात्रात आढळला पट्टेदार वाघ

Next
ठळक मुद्देनागरिकांनी केली एकच गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : भद्रावती तालुक्यातील जुना कुनाडा येथील सिरणा नदीजवळ दगडाच्या फटीमध्ये पट्टेदार वाघ अडकला असल्याची माहिती बुधवारी सकाळी नागरिकांना होताच या परिसरात नागरिकांनी एकच गर्दी केली.
या घटनेची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी स्वाती म्हैसेकर यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली गेल्या आठवडाभरापासून या परिसरातील चारगाव ,कुनाडा , देऊरवाडा परिसरात वाघाने दहशत निर्माण केली आहे दोन दिवसापूर्वी चारगाव येथील बैलावर हल्ला करून त्याला ठार केल्याची घटना घडली होती हा पट्टेदार वाघ नर असून तो वयात आल्याने तो मादीच्या शोधात भटकत असल्याची माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली
आज पहाटे या मार्गाने जाणाऱ्या वेकोली कर्मचाऱ्यांना या पात्रात वाघ दिसताच त्यांनी याबाबतची माहिती परिसरात दिली . वाघ जागेवरून कोणतीही हालचाल करत नसल्याने तो दगडात अडकला असून जखमी आहे याबाबतची माहिती अधिकारी घेत असून या घटनेबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या आहेत.

Web Title: A tiger found in the river Siran river in Chandrapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tigerवाघ