लाल पट्टा बांधलेल्या वाघाचे वास्तव्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:22 AM2021-05-29T04:22:02+5:302021-05-29T04:22:02+5:30

वरोरा वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या सालोरी कक्ष क्रमांक ११ मधील जंगलात वन्यप्राणी मोठ्या प्रमाणात आहे. याच परिसरात वाघाचे वास्तव्य आहे. वन्यप्राण्यांच्या ...

Tiger habitat with red belt | लाल पट्टा बांधलेल्या वाघाचे वास्तव्य

लाल पट्टा बांधलेल्या वाघाचे वास्तव्य

Next

वरोरा वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या सालोरी कक्ष क्रमांक ११ मधील जंगलात वन्यप्राणी मोठ्या प्रमाणात आहे. याच परिसरात वाघाचे वास्तव्य आहे. वन्यप्राण्यांच्या हालचाली टिपण्याकरिता वन विभागाने अनेक ठिकाणी कॅमेरे लावले असून या कॅमेऱ्यामध्ये गळ्यात लाल पट्टा लावलेला वाघ कैद झाला. कॅमेऱ्यामध्ये लाल पट्टा असलेला वाघ बघून वनविभाग सतर्क झाला आहे. याबाबतची माहिती वरिष्ठ वन अधिकाऱ्यांना देऊन त्या परिसरात शोधमोहीम वनविभाग राबवीत असून या शोधमोहिमेत ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील एक चमू दाखल झाला आहे. नेमका वाघ हा कुठल्या प्रकल्पातून आला, याची माहिती अद्याप समोर आली नाही. शहानिशा करणे सुरू आहे. दोन वाघांमध्ये झुंज झाल्यास हरलेला वाघ ती जागा सोडतो व एखाद्या मादीच्या शोधात भटकत असतो, असे मानले जात आहे.

कोट

ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील काही वाघांना रेडिओ कॉलर चीप लावण्यात आली आहे. वरोरा परिसरात आढळलेला वाघ दुसऱ्या प्रकल्पातील असू शकतो.

-डॉ. जितेंद्र रामगावकर, क्षेत्र संचालक ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प.

Web Title: Tiger habitat with red belt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.