अल्ट्राटेकच्या वसाहतीत शिरला वाघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2020 06:00 AM2020-02-16T06:00:00+5:302020-02-16T06:00:17+5:30

या तोफेपासून वाघाने उडी मारली. आणि झुडुपामध्ये गेला. त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या कर्मचा:यांनी व सुरक्षारक्षकांनीसुद्धा वाघ बघितला. एका युवकाने तर वसाहतीत असलेल्या वाघाचा चक्क व्हिडीओच काढला. हा व्हिडीओ संपूर्ण परिसरात व्हायरल झाला असून वाघ असल्याचे निष्पन्नसुद्धा झाले आहे. याची माहिती सर्वप्रथम पोलिसांना आणि त्यानंतर वनविभागाला देण्यात आली.

Tiger heads to UltraTech colony | अल्ट्राटेकच्या वसाहतीत शिरला वाघ

अल्ट्राटेकच्या वसाहतीत शिरला वाघ

Next
िष देरकर। लोकमत न्यूज नेटवर्ककोरपना : कोरपना तालुक्यातील अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेडमधील वसाहतीत शनिवारी एक पट्टेदार वाघ शिरला. यामुळे एकच धावपळ उडाली. सध्या नागरिक वाघाच्या दहशतीखाली आहेत. शनिवारी अनेक कामगारांना वाघाचे दर्शन झाले असून जंगल नसतानाही वसाहतीत वाघ शिरल्याने परिसरामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दीड वर्षापूर्वी याच वसाहतीत बिबट शिरला होता. वन विभागाच्या कर्मचा:यांनी त्याला जेरबंद केले होते. तीन शिफ्टमध्ये कामगार या वसाहतीतून कंपनीमध्ये जाण्याकरिता ये-जा करीत असतात. अनेक कामगारांना या ठिकाणी वाघाने दर्शन दिले. नांदाफाटा येथून कंपनीमध्ये प्रवेश केल्यानंतर गेट क्रमांक 2 जवळ सिमेंटची तोफ ठेवलेली आहे. या तोफेपासून वाघाने उडी मारली. आणि झुडुपामध्ये गेला. त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या कर्मचा:यांनी व सुरक्षारक्षकांनीसुद्धा वाघ बघितला. एका युवकाने तर वसाहतीत असलेल्या वाघाचा चक्क व्हिडीओच काढला. हा व्हिडीओ संपूर्ण परिसरात व्हायरल झाला असून वाघ असल्याचे निष्पन्नसुद्धा झाले आहे. याची माहिती सर्वप्रथम पोलिसांना आणि त्यानंतर वनविभागाला देण्यात आली.कंपनी प्रशासनानेही याचा धसका घेतला असून वसाहतीतील कामगारांना सतर्क राहण्यासाठी ठिकठिकाणी सूचना दिल्या जात आहे. लाऊड स्पीकरच्या माध्यमातून लोकांना या संदर्भात माहिती देण्यात येत आहे.या संदर्भात गडचांदूरचे ठाणोदार गोपाल भारती यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, घटनेची माहिती मिळाल्यानंतर याठिकाणी गस्त वाढवली आहे. वन विभागाच्या कर्मचा:यांना यासंबंधी माहिती देण्यात आली आहे. वन विभागाकडून वाघ असल्याची पुष्टी मिळाली आहे. अल्ट्राटेकमध्ये वाघ असल्याची पुष्टी झालेली आहे. नोकारी, पालगाव, बाखर्डीमार्गे वाघाने अल्ट्राटेकमध्ये प्रवेश केला आहे. परिसरातील दोन ते तीन गुरांना त्याने जखमी केले असून शुक्रवारीच अल्ट्राटेकमध्ये प्रवेश केला आहे. वनविभाग वाघाला पकडण्यात सतत प्रय}शील असून अल्ट्राटेकमध्ये तीन कॅमेरेसुद्धा लावण्यात आलेले आहे. नागरिकांनी वाघाला जेरबंद करेपयर्ंत सतर्क राहण्याची गरज आहे.- बी.सी. ब्रrाटेके,क्षेत्र सहायक, वनविभाग गडचांदूर

Web Title: Tiger heads to UltraTech colony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.