थरकाप! आईच्या काळजाचा तुकडा मिळाला; परंतु त्याचे काळीजच नव्हते...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2023 08:43 PM2023-03-30T20:43:02+5:302023-03-30T20:43:33+5:30

Chandrapur News एका चार वर्षीय बालकाला घराच्या अंगणातून वाघाने तोंडात उचलून नेल्याची घटना सावली तालुक्यातील गेवरा बिटातील बोरमाळा येथे बुधवारी सायंकाळच्या सुमारास घडली

Tiger killed child in Chandrapur | थरकाप! आईच्या काळजाचा तुकडा मिळाला; परंतु त्याचे काळीजच नव्हते...

थरकाप! आईच्या काळजाचा तुकडा मिळाला; परंतु त्याचे काळीजच नव्हते...

googlenewsNext

दिलीप फुलबांधे

चंद्रपूर : एका चार वर्षीय बालकाला घराच्या अंगणातून वाघाने तोंडात उचलून नेल्याची घटना सावली तालुक्यातील गेवरा बिटातील बोरमाळा येथे बुधवारी सायंकाळच्या सुमारास घडली. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली. एकुलता एक मुलगा असल्याने आईने टाहो फोडला. रात्रभर व दिवसाही वनविभाग व पोलिसांच्या पथकाने शोधमोहीम राबविली. अखेर आईच्या काळजाचा तुकडला सापडला खरा; मात्र त्याचे काळीजच नव्हते. वाघाने त्याचे ६० टक्के शरीर फस्त केले होते.

हर्षद संजय कारमेंगे (५) रा. बोरमाळा असे या मृत बालकाचे नाव आहे. सावली वनपरिक्षेत्रातील पाथरी उपक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या गेवरा बिटातील बोरमाळा येथील ही घटना उघडकीस येताच एकच खळबळ उडाली. बालकाची आई अतिक्षा ही आपल्या हर्षदला शौचास लागल्याने त्याला अंगणात बसवून उभी असतानाच वाघाने अंधाराच्या दिशेने येत हर्षदवर हल्ला केला व आईच्या डोळ्यांदेखत त्याला उचलून नेले. आईने आरडाओरड करून शेजारच्या लोकांना बोलाविले. दरम्यान घटनास्थळी सावलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रवीण विरूरकर, पाथरीचे क्षेत्र सहायक एन. बी. पाटील, सावलीचे क्षेत्र सहायक राजू कोडापे, पाथरीचे ठाणेदार मंगेश मोहोड यांनी घटनास्थळी येऊन शोधमोहीम राबविली. मात्र परिसरात वीज नसल्याने व अनावश्यक झुडपे असल्याने शोधमोहिमेत अडथळा निर्माण झाला. अखेर गुरुवारी सकाळी ६ वाजता घटनास्थळापासून चारशे मीटर अंतरावर हर्षदचा मृतदेह सापडला. त्याच्या शरीराचा कमरेवरील भाग नव्हताच. अर्धवट कमरे खालील भाग, एक हात व अर्धवट खाल्लेला डोक्याचा भाग आढळून आला. हे चित्र बघून त्या मातेच्या काळजाचा ठोकाच चुकला.

जेवण तयार होते; मात्र हर्षद परतलाच नाही

चिमुकला हर्षद वडील संजय व आई अतिक्षा यांचा एकुलता एक मुलगा होता. वडील कुटुंबाचा गाडा हाकण्यासाठी मजुरीसाठी बाहेर कामाला गेले होते. आई हर्षदला घेऊन घरी होती. आईने सायंकाळी स्वयंपाक करून हर्षदला खाऊ घालण्यासाठी तयारी केली. परंतु तेव्हाच हर्षला शौचास जायचे असल्याने त्याने आईला सांगितले. त्यांची परिस्थिती एवढी हलाखीची की घरी वीज नाही. घरासमोरील अंगणात आईने त्याला शौचास बसविले होते, त्याचवेळी वाघाने डाव साधला.

Web Title: Tiger killed child in Chandrapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tigerवाघ