चंद्रपूर जिल्ह्यात बाम्हणी येथील घरात वाघाने मांडले ठाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2020 10:55 AM2020-06-22T10:55:10+5:302020-06-22T10:55:29+5:30

चंद्रपूर : तालुक्यातील बाम्हणी येथील श्रीकांत देशमुख यांच्या घरात रविवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास पट्टेदार वाघ शिरल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

A tiger landed in house in Chandrapur district | चंद्रपूर जिल्ह्यात बाम्हणी येथील घरात वाघाने मांडले ठाण

चंद्रपूर जिल्ह्यात बाम्हणी येथील घरात वाघाने मांडले ठाण

Next
ठळक मुद्देनागरिकांची उसळली गर्दी


घनश्याम नवघडे
चंद्रपूर : तालुक्यातील बाम्हणी येथील श्रीकांत देशमुख यांच्या घरात रविवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास पट्टेदार वाघ शिरल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या वाघाला बघण्यासाठी परिसरातील पाच हजारावर लोकांनी बाम्हणीकडे धाव घेतली. रात्री ८ वाजेपर्यंत वाघाने घरातच ठाण मांडले होते. आणि त्याला बघण्यासाठी गर्दीही कायम होती.

दुपारी ४ वाजताच्या सुमारास हा वाघ गावकऱ्यांना दिसून आला. बघता बघता ही माहिती पंचक्रोशीत पोहचली आणि या वाघाला बघण्यासाठी एकच गर्दी उसळली. दरम्यान, वनविभागाला ही माहिती देण्यात आली. माहिती मिळताच वनपरिक्षेत्राधिकारी महेश गायकवाड ताफ्यासह घटनास्थळी पोहचले. पोलीसही आले. त्यांनी लोकांना हटविण्याचे बरेच प्रयत्न केले. पण ते निष्फळ ठरले. घरात दडून असलेल्या या वाघास ताब्यात कसे घ्यायचे, यावर वनविभागाचे अधिकारी यांचे विचारविनिमय करण्यात झाल्यानंतर वाघ ज्या घरात बसला होता, त्या घराभोवती जाळे टाकण्यात आले. पण वाघ बाहेर पडला नाही. रात्री ८ वाजेपर्यंत वाघ घरातच होता. दरम्यान वाघास बेशुद्ध करून ताब्यात घेण्याबाबत वन अधिकाऱ्यांनी प्रयत्न सुरू केले होते. पण ते कसे करायचे याचे लोकेशन मिळत नव्हते.

मनोहर पाल गंभीर जखमी
वाघाने ज्या घरी दडी मारली, त्याच्या बाजूलाच मनोहर पाल हे शेताची नांगरणी करीत होते. वाघ त्यांच्या नजरेस पडताच ते वाघ वाघ असे जोराने ओरडले व वाघ त्यांच्या बैलांवर हल्ला करेल म्हणून ते लगबगीने औताला जुंपलेले बैल सोडत असतानाच या वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या कानाजवळ चांगलीच दुखापत झाली. त्यांना लागलीच नागभीडच्या ग्रामीण रूग्णालयात प्राथमिक उपचार करून चंद्रपूरला हलविण्यात आले.

Web Title: A tiger landed in house in Chandrapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tigerवाघ