देवाडा खुर्द परिसरात वाघाचा संचार, शेतकरी दहशतीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2020 05:00 AM2020-08-23T05:00:00+5:302020-08-23T05:00:47+5:30

शेतकऱ्याला भरपाई मिळावी, यासाठी प्रकरण वरिष्ठांकडे सादर केले आहे. रामपूर दीक्षित येथील मारोती खोब्रागडे व जाम तुकूम येथील आबू सुरजागडे यांच्या गायी कक्ष क्रमांक ६७२ मध्ये चराईसाठी गेल्या होत्या. त्यांच्यावरही वाघाने हल्ला केला. देवाडा खुर्द येथील अंकूश बुरांडे यांच्या दोन गायी वाघाच्या तावडीतून बचावल्या. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले.

Tiger movement in Devada Khurd area, farmers terrified | देवाडा खुर्द परिसरात वाघाचा संचार, शेतकरी दहशतीत

देवाडा खुर्द परिसरात वाघाचा संचार, शेतकरी दहशतीत

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पोंभुर्णा : देवाडा खुर्द व जामतुकूम परिसरात एक आठवड्यापासून वाघाचा संचार सुरू आहे. काही दिवसांपूर्वी वाघाच्या हल्ल्यात तीन जनावरे ठारे तर दोन जनावरे जखमी केल्याची घटना घडली होती. तेव्हापासून नागरिक दहशतीत आहेत.
देवाडा खुर्द रामपूर दीक्षित, झुल्लुरवार तुकूम, गोमपाटील तुकूम, डोंगरहळदी, जामतुकूम, जामखुर्द, हत्तीबोडी परिसरातील जनावरे वनविभागाच्या कक्ष क्रमांक ६७२ मध्ये चराईसाठी जातात. मागील आठवड्यात झुल्लुरवार तुकूम येथील शेतकरी पुरूषोत्तम बुरांडे यांची तीन जनावरे कक्ष क्र. ५१६ मध्ये चरण्यासाठी गेले असता वाघाच्या हल्ल्यात ठार झाले.
या घटनेची माहिती दिल्यानंतर वनरक्षक बी. बी. म्हस्के व क्षेत्र सहाय्यक डी. एन. ढोळे यांनी पंचनामा केला.
शेतकऱ्याला भरपाई मिळावी, यासाठी प्रकरण वरिष्ठांकडे सादर केले आहे. रामपूर दीक्षित येथील मारोती खोब्रागडे व जाम तुकूम येथील आबू सुरजागडे यांच्या गायी कक्ष क्रमांक ६७२ मध्ये चराईसाठी गेल्या होत्या. त्यांच्यावरही वाघाने हल्ला केला. देवाडा खुर्द येथील अंकूश बुरांडे यांच्या दोन गायी वाघाच्या तावडीतून बचावल्या. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले.
मागील काही दिवसांपासून वाघाच्या हल्ल्याच्या घटना घटना वाढत असल्याने शेतकरी व नागरिक दहशतीत आहेत. शेतीची कामे करताना संकटांचा सामना करावा लागत आहे. वनविभागाने वाघाचा बंदोबस्त करावा व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्याची मागणी गावकºयांनी निवेदनातून केली आहे.

वन कक्ष क्र. ५२६, ५१६ मध्ये वाघाने हल्ला केल्याने दोन जनावरे ठार झाले. या घटनेचा पंचनामा करून भरपाईसाठी वरिष्ठ अधिकाºयाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. या परिसरात वाघाचे पगमार्क आढळले. वरिष्ठांच्या सुचनेनुसार कॅमेरे लावणे सुरू आहे.
- बी. बी. म्हस्के,
वनरक्षक, डोंगरहळदी

रामपूर दीक्षित येथील वन संरक्षण समिती अंतर्गत २०१८-१९ मध्ये २५ हेक्टर जागेत वृक्ष लागवड झाली. वृक्षांचे संरक्षण करण्यासाठी समितीचे सदस्य जात आहेत. मात्र, या परिसरात वाघाचा संचार सुरू आहे. त्यामुळे वाघाचा तात्काळ बंदोबस्त करावा.
- धनराज निमसरकार, सदस्य वनसरंक्षण समिती, रामपूर दीक्षित
 

Web Title: Tiger movement in Devada Khurd area, farmers terrified

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tigerवाघ