वीज वितरण कार्यालयाजवळ वाघाने मांडले बस्तान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2020 05:00 AM2020-06-15T05:00:00+5:302020-06-15T05:01:09+5:30
शंकरपूर येथील विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयाजवळील झुडपात नागरिकांना वाघ दिसून आला. याबाबतची माहिती गावात पसरताच बघ्याची मोठी गर्दी जमली. नागरिकांची गर्दी बघताच वाघ बाहेर निघाला. त्यामुळे लोकांची पळापळ झाली. यावेळी दोघेजण पडल्याने जखमी झाले. त्यांच्यावर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आला. घटनेची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी चिवंडे यांना मिळताच ते आपल्या चमूसह दाखल झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
शंकरपूर : चिमूर तालुक्यातील शंकरपूर येथील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयाजवळ पट्टेदार वाघाने बस्तान मांडले. वाघाला बघण्यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. वाघापासून कोणालाही धोका होऊ नये, यासाठी शेतकरी व शेतमजुरांना घरी पाठवण्यात आले. हा प्रकार रविवारी घडला.
शंकरपूर येथील विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयाजवळील झुडपात नागरिकांना वाघ दिसून आला. याबाबतची माहिती गावात पसरताच बघ्याची मोठी गर्दी जमली. नागरिकांची गर्दी बघताच वाघ बाहेर निघाला. त्यामुळे लोकांची पळापळ झाली. यावेळी दोघेजण पडल्याने जखमी झाले. त्यांच्यावर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आला. घटनेची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी चिवंडे यांना मिळताच ते आपल्या चमूसह दाखल झाले. तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद जांभुळे, तरुण पर्यावरणवादी मंडळाचे सदस्य घटनास्थळी दाखल झाले. जंगलाच्या दिशेन वाघाला बाहेर काढण्यात येणार असल्याची माहितीभाविक चिवंडे यांनी दिली.