ताडोबा अंधारी प्रकल्पातील वाघ ‘लय भारी’

By admin | Published: November 30, 2015 01:01 AM2015-11-30T01:01:51+5:302015-11-30T01:02:36+5:30

तंत्रज्ञानाने कोणीही प्रगती केली तरी निसर्ग-निसर्ग असतो. निसर्गावर कुणी मात करू शकत नाही. आजच्या धकाधकीच्या जीवनात नैसर्गिक सौदर्य मनाला मोहून टाकते.

The tiger 'Tiger heavy' of the Tadoba Andheri project | ताडोबा अंधारी प्रकल्पातील वाघ ‘लय भारी’

ताडोबा अंधारी प्रकल्पातील वाघ ‘लय भारी’

Next

सपत्निक जंगल भ्रमंती : गोलंदाज वरुण अ‍ॅरानची लोकमतशी बातचित
राजकुमार चुनारकर खडसंगी
तंत्रज्ञानाने कोणीही प्रगती केली तरी निसर्ग-निसर्ग असतो. निसर्गावर कुणी मात करू शकत नाही. आजच्या धकाधकीच्या जीवनात नैसर्गिक सौदर्य मनाला मोहून टाकते. त्यामुळे निसर्गाची आवड सर्वांना असते. म्हणूनच नागपूरची कसोटी लवकर संपल्याने देशातील प्रसिद्ध असलेल्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला भेट दिली. या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वाघ ‘लय भारी’ असल्याची प्रतिक्रिया भारतीय क्रिकेट टिमचे मध्यमगती गोलंदाज वरून अ‍ॅरान यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.
दक्षिण आफ्रिकेचा संघ भारताच्या दौऱ्यावर असुन नागपूर येथील विदर्भ क्रिकेटच्या जामठा स्टेडियमवर तिसरी कसोटी २५ ते २९ नोव्हेंबरदरम्यान खेळली गेली. या कसोटीचा निर्णय तिन दिवसातच भारताच्या बाजूने लागल्याने विजयाच्या आनंदासह भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंनी जंगलभ्रमंतीचा आनंद लुटला. भारतीय संघाचा मध्यमगती गोलंदाज वरून अ‍ॅरान रविवारी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात जंगल सफारीसाठी चिमूर तालुक्यातील कोलारा गेटवर आला असता त्याने ‘लोकमत’शी बातचीत केली.
मूळचा झारखंड राज्यातील जमशेटपूर येथील २७ वर्षीय वरुण रेमॅन्ड अ‍ॅरान याने भारतीय कसोटी संघात २२ नोव्हेंबर २०११ ला वेस्ट इंडिजसोबत पहिली कसोटी खेळली. नागपूर कसोटीच्या विजयानंतर दोन दिवसाचा वेळ असल्याने मी माझ्या परिवारासह ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात पर्यटनासाठी आलो. सकाळी ६.०० वाजता जंगल सफारी केली असता ताडोबातील वाघाचे प्रथमच दर्शन झाले. सोबतच हरिण, सांबर व वेगवेगळ्या प्रकाराचे प्राणी पाहावयास मिळाल्याचे त्याने सांगितले.
शासनाच्या ‘वाघ बचाओ मोहिमे’बाबत विचारले असता, वाघ वाचायलाच पाहिजे. त्यासाठी माझ्याकडून जे करता येईल ते करण्यास मी सदैव तयार आहे. पर्यावरण वाचवण्याच्या दृष्टीने मी सध्या बंगलोर येथील पर्यावरण संस्थेशी जुळला असल्याची माहितीही त्याने यावेळी दिली.
नागपूर कसोटी सामन्याच्या विजयाबाबत वरुण अ‍ॅरानला बोलते करण्याचा प्रयत्न केला असता, क्रिकेट विषयी बोलण्याचे टाळत बीसीसीआईची आचारसंहिता असल्याने क्रिकेटबाबत कुठल्याही मुद्यावर त्याने बोलणे टाळले. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प व इतर वातावरणाने भारावलो. त्यामुळे आणखी एखादी संधी मिळाल्यास या व्याघ्र प्रकल्पास भेट नक्की देईन, असे तो म्हणाला.
याच गेटवरून सलामी फलंदाज मुरली विजय याने जंगलभ्रमंती केली. मात्र त्याने माध्यमापासून दूर राहणे पसंत केले.

Web Title: The tiger 'Tiger heavy' of the Tadoba Andheri project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.