चंद्रपूर जिल्ह्यात कापूस वेचणीसाठी गेलेल्या महिलेवर वाघाने केला हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 10:47 AM2018-02-17T10:47:20+5:302018-02-17T10:47:56+5:30

जिल्ह्याच्या तळोधी वनपरिक्षेत्रातील नेरी -चिमूर रस्त्यावरील शिवारात कापूस वेचणीसाठी गेलेल्या एका महिलेवर वाघाने मागून येऊन हल्ला चढविल्याची घटना येथे शनिवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली.

Tigers attacked the woman in Chandrapur district | चंद्रपूर जिल्ह्यात कापूस वेचणीसाठी गेलेल्या महिलेवर वाघाने केला हल्ला

चंद्रपूर जिल्ह्यात कापूस वेचणीसाठी गेलेल्या महिलेवर वाघाने केला हल्ला

Next
ठळक मुद्देमानेवर व पाठीवर गंभीर जखमा

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर: जिल्ह्याच्या तळोधी वनपरिक्षेत्रातील नेरी -चिमूर रस्त्यावरील शिवारात कापूस वेचणीसाठी गेलेल्या एका महिलेवर वाघाने मागून येऊन हल्ला चढविल्याची घटना येथे शनिवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली. नम्रता राजेश पिसे (३५) असे या जखमी महिलेचे नाव आहे. तिला चिमूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. वाघाने तिच्या मानेवर व पाठीवर गंभीर जखमा केल्या आहेत. हा वाघ शिवारातच असल्याचे गावकऱ्यांकडून सांगितले जाते आहे. या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Web Title: Tigers attacked the woman in Chandrapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.