वाघ, बिबट्याच्या दहशतीमुळे उडाली झोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 09:53 PM2018-11-20T21:53:50+5:302018-11-20T21:54:30+5:30

कोठारी गावात मागील पंधरा दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला असून तीन जणांना जखमी केले आहे. तर आनंद नगरातील कस्तुरे यांच्या सात कोंबड्यावर ताव मारला आहे. तसेच तीन मोकाट कुत्र्यांवर हल्ला करून फस्त केले आहे.

Tigers, lethal shots sleepy | वाघ, बिबट्याच्या दहशतीमुळे उडाली झोप

वाघ, बिबट्याच्या दहशतीमुळे उडाली झोप

Next
ठळक मुद्देवाघाच्या हल्ल्यात तीन जनावरे ठार : बिबट्याने सात कोंबड्या केल्या फस्त

लोकमत न्यूज नेटवर्क
कोठारी : कोठारी गावात मागील पंधरा दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला असून तीन जणांना जखमी केले आहे. तर आनंद नगरातील कस्तुरे यांच्या सात कोंबड्यावर ताव मारला आहे. तसेच तीन मोकाट कुत्र्यांवर हल्ला करून फस्त केले आहे. बिबट्याच्या बंदोबस्तासाठी वनविभागाने दोन पिंजरे लावले असून पंधरा कॅमेरे ठिकठिकाणी लावून हालचाल टिपण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र बिबटाने वनविभागाला गुंगारा देत तो कॅमेरातही आला नाही व पिंजऱ्याजवळ फिरकला नाही.एकूण बिबट्याच्या दहशतीमुळे नागरिकांची झोप उडाली आहे.
बिबटाने गावात प्रवेश करू नये, यासाठी सौर उर्जेवरील व बॅटरीवरील करंट तार जंगल हद्दीत लावलेले आहेत. मात्र बिबट्याच्या हालचाली व जंगल शेजारच्या घराजवळ दररोज नागरिकांना बिबट दर्शन देत आहे. रविवारला आंनदनगर येथील कस्तुरे यांच्या घरी जावून सात कोंबड्या बिबट्याने फस्त केल्या. त्यामुळे गावकºयात कमालीची दहशत पसरली असून संध्याकाळी ६ नंतर रस्ते ओस पडलेले असतात व गावकºयांनी घराबाहेर जाणे बंद केल्याचे दिसून येत आहे. वनविभागाचे कर्मचारी दिवसरात्र कवडजई - कोठारी रस्त्यावर गस्त करीत आहेत.
कोठारी बामणी, काटवली, पळसगाव, हरणपायली, आमडी व कळमना शिवारात नदीपात्राच्या तसेच कोठारी नाल्याच्या लगत वाघाने दहशत निर्माण केली असून चार जणांवरांना शेतात ठार केले आहे. शिवारात व नदीच्या पट्टयात वाघाला अनेक शेतकऱ्यांनी व नदीत मच्छिमारांनी बघितले आहे. या भागात वाघाने बस्तान मांडले असून दिवसरात्र शेतात फिरताना दिसून येत आहे. वाघाच्या सततच्या भ्रमंतीने शेतकºयात भितीदायक वातावरण निर्माण झाले आहे. वाघाच्या भीतीपोटी शेतकऱ्यांनी रात्रीची जागल बंद केली आहे. उभ्या पिकांना पाणी देण्यासाठी शेतात रात्री जावे लागते. वीज वितरण कंपनीने रात्रीची लोडशेडींग बंद केल्याने दिवसा पिकांना पाणी करणे शक्य नाही. परिणामी पिकांच्या उत्पादनावर परिणाम होणार आहे.
वाघाला जेरबंद करण्याची मागणी
शिवारात सतत फिरणाऱ्या वाघामुळे शेतकरी दहशतीखाली असून त्याचा विपरित परिणाम शेतमालावर होत आहे. शेतातील जनावरांवर हल्ले होत असून बैलांना ठार करीत आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला असून वनविभागाने वाघाला जेरबंद करण्याची मागणी डॉ. देवानंद गुरू, दीपक लोहे, वासुदेव खाडे, संतोष इटनकर यांनी करीत ठार झालेल्या जनावरांबाबत त्वरित नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.

कोठारी गावात बिबट्याने दहशत निर्माण केली असून यात तीन जण जखमी झाले आहेत. बिबट्याच्या बंदोबस्तासाठी वनविभाग सतत प्रयत्न करीत असून यंत्रणा अविरत काम करीत आहे. बिबट्याच्या हालचालीवर पूर्ण लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. तसेच कोठरी परिसरात वाघाचे वास्तव्य असल्याचे व जनावरांवर हल्ला करून शिवारात भ्रमंती करीत असल्याचे समजले. त्यावर योग्य उपाययोजना करण्यात येणार आहे.
- गजेंद्र हिरे,
उपवनसंरक्षक, मध्यचांदा वनविभाग, चंद्रपूर.

Web Title: Tigers, lethal shots sleepy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.