ताडोबा बफर झोन क्षेत्रात वाघ, बिबट्याची दहशत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2017 12:10 PM2017-11-06T12:10:28+5:302017-11-06T12:13:18+5:30
ताडोबा बफर झोन क्षेत्रातील ७९ गावात वाघ, बिबट्याची दहशत पसरली असून वाघ, बिबट्याने अनेक जनावरांना फस्त केले आहे.
आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर: ताडोबा बफर झोन क्षेत्रातील ७९ गावात वाघ, बिबट्याची दहशत पसरली असून वाघ, बिबट्याने अनेक जनावरांना फस्त केले आहे. त्यामुळे गावकऱ्यांत भिती असून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
रोज एक दोन जनावरे बफर झोन क्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात फस्त होत आहेत. तर कधी कधी नागरिकांवरही सुद्धा वाघाचा हल्ला होत आहे. गावाशेजारी वाघाचे बस्तान असल्याने गावातील नागरिकाला बाहेरगावी संध्याकाळ झाल्यावर जाणे कठीण झाले आहे.
शेतात जाताना वाघाचे दर्शन ही नित्याची बाब झाली आहे. शेतात वन्यप्राणी पिकाची नासाडी करतात. त्यामुळे शेतकऱ्यांला शेतात जाणे आवश्यक आहे. पण वाघाच्या दहशतीत शेतात जागल बंद झाली आहे. शेतीच्या हंगामात वाघ शेतात वावरताना प्रत्यक्षात काही लोकांना दिसला. त्यामुळे शेतकरी भयभीत आहेत.