ताडोबातील वाघांनी दिली मास्टर ब्लास्टरला हुलकावणी, व्याघ्रदर्शन नाहीच
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2021 05:09 AM2021-09-06T05:09:13+5:302021-09-06T05:10:29+5:30
रविवारीही सर्वांनी अलिझंजा बफर गेटमधून वाघाच्या दर्शनासाठी सफारी केली. चार तासांच्या भ्रमंतीनंतरही तेंडुलकर कुटुबीय आणि मित्रपरिवाराला वाघाचे दर्शन झाले नाही.
चिमूर (जि. चंद्रपूर) : वाघांच्या हमखास दर्शनासाठी प्रसिद्ध असलेल्या तथा मोठमोठ्यांना भुरळ घातलेल्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात वाघांच्या भेटीसाठी शनिवारी दाखल झालेल्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला शनिवारी व रविवारी दोन्ही दिवस ताडोबातील वाघांनी हुलकावणी दिली.
सचिन तेंडुलकर हे पत्नी अंजली, मुलगी सारा व मित्रपरिवारासह शनिवारी आले. चिमूर तालुक्यातील बांबू रिसॉर्टमध्ये दुपारी २ वाजता सगळे दाखल झाले. दोन तासांच्या विश्रांतीनंतर शनिवारी ४ वाजता त्यांनी मदनापूर बफरझोन गेटमधून सफारी केली. मात्र, या सफारीत त्यांना वाघ दिसला नाही. रविवारीही सर्वांनी अलिझंजा बफर गेटमधून वाघाच्या दर्शनासाठी सफारी केली. चार तासांच्या भ्रमंतीनंतरही तेंडुलकर कुटुबीय आणि मित्रपरिवाराला वाघाचे दर्शन झाले नाही.
कोअर बंद असल्याने बफरमध्येच सफारी
व्याघ्र प्रकल्प व्यवस्थापनाच्या नियमानुसार, पावसाळ्यात कोअर झोनमध्ये १ ऑक्टोबरपर्यंत सफारीला बंदी असते. मात्र, पर्यटकांचा हिरमोड होऊ नये, यासाठी बफर झोनमध्ये पावसाळ्यातही सफारी सुरू असते. यामध्ये वाघांचे दर्शन होणे हे भाग्यच समजले जाते.