प्रवशांकडून आरक्षणाला तिलाजंली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:26 AM2021-03-28T04:26:26+5:302021-03-28T04:26:26+5:30

राज्य परिवहन महामंडळाने बसफेऱ्यामध्ये सीट आरक्षित करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मात्र याबाबत पाहिजे त्या प्रमाणात जनजागृती झाली ...

Tilajanli to reservation from passengers | प्रवशांकडून आरक्षणाला तिलाजंली

प्रवशांकडून आरक्षणाला तिलाजंली

Next

राज्य परिवहन महामंडळाने बसफेऱ्यामध्ये सीट आरक्षित करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मात्र याबाबत पाहिजे त्या प्रमाणात जनजागृती झाली नाही. परंतु, लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी काही प्रमाणात प्रवासी सीट आरक्षित करतात. परंतु, जवळच्या पल्ल्यामध्ये आरक्षित करीत नाही. बहुतांश चंद्रपूर येथून हैदराबाद, औरंगाबाद, अमरावती, नागपूर येथे जाण्यासाठी आरक्षण करीत असल्याचे दिसून येते. मात्र मागील वर्षी कोरोनाने शिरकाव केल्याने बसफेऱ्या बंद होत्या. त्यानंतर ५० टक्के तत्वावर बसफेऱ्या सुरू करण्यात आल्या. रेल्वे बंद असल्याने लांबच्या पल्ल्यासाठी काही प्रमाणात सीट आरक्षित करण्यात येत होत्या. परिस्थिती पूर्वपदावर येत असतानाच जिल्ह्यात पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढीस लागली. त्यामुळे आपोआपच प्रवाशांची संख्या घटली. त्यामुळे सीट आरक्षित करणाऱ्यांची संख्या घटली आहे. चंद्रपूर आगारातून हैदराबादसाठी काही प्रमाणात आरक्षण करण्यात येत असल्याचे दिसून येते. मात्र इतर ठिकाणी जाण्यासाठी आरक्षण करीत नसल्याचे चित्र आहे.

बॉक्स

रातराणी केवळ एकच

दिवसा धावणाऱ्या बससाठीच प्रवासी मिळेनासे झाले आहेत. त्यामुळे रात्रीच्या बसेससाठीसुद्धा कमी प्रवासी मिळतात. चंद्रपूर येथून रातराणी म्हणून केवळ एकच बस अंबाजोगाईसाठी धावत आहे. परंतु, या बससाठीसुद्धा आरक्षण करण्यात येत असल्याचे प्रमाणात अत्यल्प आहे. कोरोनापासून प्रवाशांची संख्या घटली आहे.

बॉक्स

नो वेटिंग

कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने प्रवाशांची संख्या घटत आहे. लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी पूर्वी आरक्षण बुकिंग होत होती. आता जाणारे प्रवासीच घटल्याने हमखास सीट मिळते या भावनेने प्रवाशांतर्फे आरक्षण करताना दिसून येत नाही. तसेच बसमध्ये ट्रेनसारखा वेटिंगचा प्रकार बघावयास मिळत नाही.

बॉक्स

जिल्हाबाहेर जाणाऱ्यांची संख्या घटली

चंद्रपूर जिल्ह्यात दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे बाहेरगावी जाणाऱ्यांची संख्या घटली आहे. परिस्थिती चांगली होईपर्यंत प्रवासी संख्या वाढण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळे बसफेऱ्याही कमी झाल्या आहेत. काही प्रमाणात याचा फटका प्रवाशांनाही बसत आहे.

बॉक्स

८५ बसेस रोज

जिल्हा मुख्यालयातून विविध मार्गावर ८५ बसेसच्या माध्यमातून सुमारे ५०० फेऱ्याचे शेड्यूल सध्या सुरू आहे. यामध्ये ग्रामीण भागासह शहरी भागाचाही समावेश आहे.

-लांब पल्ल्याच्या बसफेऱ्यासाठी प्रवासी संख्या घटल्याने गाड्याही काही प्रमाणात कमी करण्यात आल्या आहेत. कोरोना काळात ग्रामीण भागात बंद करण्यात आलेल्या बसफेऱ्या अद्यापही सुरू करण्यात आल्या नाही.

Web Title: Tilajanli to reservation from passengers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.