बांबू अभावी कामगारांवर उपासमारीची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:29 AM2021-04-04T04:29:14+5:302021-04-04T04:29:14+5:30
चंद्रपूर : बांबूपासून कलात्मक टोपल्या, चटई, सुप, परडी आदी वस्तू तयार करणाऱ्या व्यावसायिक ही कोरोना संकटामुळे धोक्यात आले आहे. ...
चंद्रपूर : बांबूपासून कलात्मक टोपल्या, चटई, सुप, परडी आदी वस्तू तयार करणाऱ्या व्यावसायिक ही कोरोना संकटामुळे धोक्यात आले आहे. त्यातच योग्य बांबू मिळत नसल्यामुळे व्यवसाय ठप्प होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे शासनाने याकडे लक्ष देऊन बांबू तसेच योग्य भाव मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा, अशी मागणी केली जात आहे.
बांबूपासून विविध प्रकारच्या वस्तू तयार करणे व त्याची बाजारात विक्री करून त्याच्यावर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविणे असा दिनक्रम बुरड समाजासह काही कारागिरांनी सुरु केला आहे. या व्यवसायात मेहनत व सूक्ष्म नजरेचा उपयोग करून तासनतास जमिनीवर बसून कुटुंबातील सर्व सदस्यांसह ते विणण्याची कला त्यांना आत्मसात झाली आहे. परंतु अलीकडच्या काळात बांबूपासून बनणाऱ्या सुप, टोपले आदी वस्तूंची जागा आता फायबरने घेतल्याने त्याचा व्यवसाय काही प्रमाणात मोडकळीस आला आहे. त्यातच मागील वर्षभरापासून कोरोना संकट घोंघावत आहे. त्यामुळे हा व्यवसाय अधिकच अडचणीत आला आहे.
बांबूपासून तयार होणाऱ्या वस्तू विक्रीची किंमत तर कमी झालीच परंतु त्याच बरोबर फायबरच्या वस्तूची किंमत वाढली असतानाही नागरिक त्याच वस्तूच्या खरेदीसाठी गर्दी करीत आहे. त्यातच कोरोनामुळे मागील वर्षभरापासून सर्वच व्यवसाय अडचणीत आले आहे. सध्या पुन्हा कोरोना रुग्ण संख्या वाढत आहे. लाॅकडाऊन होण्याची स्थिती आहे. त्यामुळे या व्यावसायिक कुटुंब चांगलेच धास्तावले आहे. त्यातच बांबूचा पुरवठा होत नसल्याने अडचणीत अधिकच भर पडत आहे. त्यामुळे शासनाने सवलतीच्या दरात बांबू पुरवठा करावा, तसेच कारागिरांना मानधन देण्याची मागणीही केली जात आहे.