काळ आला, पण वेळ आली नव्हती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:21 AM2021-06-25T04:21:03+5:302021-06-25T04:21:03+5:30
नवरगाव : रत्नापूर फाट्यावरून दोन मित्र कारने पिपर्डा ताडोबाकडे जात असताना सायकलस्वार अचानक आडवा आला. त्याला वाचविण्याच्या ...
नवरगाव : रत्नापूर फाट्यावरून दोन मित्र कारने पिपर्डा ताडोबाकडे जात असताना सायकलस्वार अचानक आडवा आला. त्याला वाचविण्याच्या प्रयत्नामध्ये चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले व गाडी विद्युत खांबाला आदळली. यामध्ये खांब तुटून गाडीवरच पडला; परंतु लगेच फ्युज उडाल्याने वीज पुरवठा खंडित झाला आणि दोघेही बचावले. ही घटना गुरुवारी दुपारी १ वाजता घडली.
सिंदेवाही तालुक्यातील पवना पवनपार येथील दोन मित्र कारने रत्नापूर फाट्यावरून रत्नापूर मार्गे पिपर्डा ताडोबाकडे जात असताना रत्नापूर फाट्यावर एक सायकलस्वार अचानक आडवा आला आणि चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. सायकलस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नामध्ये कार सरळ विद्युत वाहक इलेक्ट्रिक खांबाला आदळली. गाडी आदळल्याने विद्युत वाहक तारासुद्धा एकमेकांना आदळल्या आणि खांब गाडीवर पडला; परंतु डिपीवरून फ्युज उडाल्याने वीज पुरवठा खंडित झाला आणि गाडीतील दोघेही सुखरूप बचावले. कार चालकाचे आणि विद्युत विभागाचे नुकसान झाले; मात्र विद्युत विभागाने नुकसान भरपाई म्हणून चालकाकडून ८५०० रुपये वसूल केल्याची माहिती आहे.
===Photopath===
240621\img-20210624-wa0003.jpg
===Caption===
पोल तुटल्यानंतर असा गाडीवरच पडला