साडेचार लाखांचा तंबाखू जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2024 13:44 IST2024-05-03T13:42:55+5:302024-05-03T13:44:21+5:30
Chandrapur : जप्त केलेला सुगंधित तंबाखू व पोलिस कर्मचारी.

Tobacco worth four and a half lakhs seized
लोकमत न्यूज नेटवर्क
बल्लारपूर : येथील बसस्थानकात नागपूरहून आसिफाबादकडे जाणारा पाच पोती सुगंधित तंबाखू पोलिसांनी जप्त केला. यावेळी एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले.
मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर येथून आसिफाबादकडे जाणाऱ्या बसमधून सुगंधित तंबाखूची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्या आधारे पोलिसांनी सायंकाळी ६ वाजता बल्लारपूर बसस्थानकामध्ये सापळा रचून पाच पोती सुगंधित तंबाखू (किंमत साडेचार लाख) जप्त केला व एकाला अटक केली. ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी दीपक साखरे यांच्या मार्गदर्शनाखाली बल्लारपूरचे पोलिस निरीक्षक असिफराजा शेख, सहायक पोलिस निरीक्षक दीपक कंक्रीटवार यांनी केली.