रक्तदानाच्या उपक्रमातून आज बाबूजींना आदरांजली
By admin | Published: July 2, 2016 01:03 AM2016-07-02T01:03:18+5:302016-07-02T01:03:18+5:30
ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमतचे संस्थापक-संपादक स्व. जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबुजी यांच्या ९३ वी जयंती ....
संयुक्त उपक्रम : लोकमत व लाईफलाईन ब्लड बँक कॅम्पोनेट अप्रायसेस सेंटरचा सहभाग
चंद्रपूर: ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमतचे संस्थापक-संपादक स्व. जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबुजी यांच्या ९३ वी जयंती २ जुलैला यंदाही रक्तदानाच्या सामाजिक उपक्रमाने पार पडत आहे. स्थानिक शामाप्रसाद मुखर्जी वाचनालय (जटपुरा गेट, रामाळा तलाव रोड, चंद्रपूर) येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी १० वाजता पाहुण्यांच्या हस्ते बाबुजींच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून या उपक्रमाला सुरूवात होईल. बाबूजींचा स्मृतिदिन सामाजिक उपक्रमांच्या माध्यामातून पार पाडण्याची परंपरा मागील अनेक वर्षांपासून सुरू आहे. त्यानुसार या सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
रक्तदान हे श्रेष्ठ दान असे म्हटले जाते. आजच्या धकाधकीच्या दिवसात रूग्णांना भासणारी रक्ताची गरज लक्षात घेवून या सामाजिक उत्तरदायित्वाच्या उपक्रमात सहभागी होऊन रक्तदान करण्याचे आवाहन लोकमत वृत्तपत्र समूहाकडून करण्यात येत आहे. लोकमतचे वाचक, सामाजिक संघटना, लोकमत सखी मंच सदस्य, लोकमत युवा नेक्स्ट सदस्य व सर्व स्तरातील नागरिकांना यात सहभागी व्हावे, अशी विनंती आयोजकांनी केली आहे.
रक्तदान करणाऱ्यास आकर्षक भेटवस्तू आणि प्रमाणपत्र देण्यात येईल. रक्तदात्यांनी अधिक माहितीकरिता लोकमत जिल्हा कार्यालय, धनराज प्लाझा, दुसरा माळा, लोकमान्य टिळक कन्या विद्यालयाच्या बाजूला, मेन रोड, चंद्रपूर आणि मोबाईल क्रमांक ९०११३२२६७४, ९८९०६५३०६४ येथे संपर्क साधावा. (शहर प्रतिनिधी)