रक्तदान व वृक्षोरापण कार्यक्रमातून आज बाबूजींना आदरांजली
By admin | Published: July 2, 2017 12:33 AM2017-07-02T00:33:07+5:302017-07-02T00:33:07+5:30
स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक-संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त...
लोकमत-आयएमएचा उपक्रम : डॉक्टर्स डे अंतर्गत सामूहिक आयोजन
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक-संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त रविवार दि. २ जुलैला चंद्रपुरात रक्तदान शिबिरासह वृक्षारोपण या सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
लोकमत जिल्हा कार्यालय आणि इंंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए), आयुष ब्लड बँक, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या उपक्रमात शहरातील अध्ययन भारती, युवा मित्र संघटना, पर्यावरण संवर्धन व विकास समिती, बेटी बचाव बेटी पढाओ अभियान व नटराज डॉन्स ग्रूप अकादमीसह अनेक सामाजिक व शैक्षणिक संस्थाही सहभागी होत आहेत. २ जुलैला सकाळी ८ वाजता बायपास मार्गावरील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसर व प्लास्टिक रिसायकलींग फॅक्टरी परिसरात वृक्षारोपणाने या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात येणार आहे.
यानंतर स्थानिक सरदार पटेल महाविद्यालयाजवळील आयएमए सभागृहात सकाळी १० वाजता या रक्तदान शिबिराला सुरूवात होणार आहे. स्व. बाबूजींच्या प्रतिमेपुढे पुष्पाजंली अर्पण करून रक्तदान शिबिराला सुरूवात होईल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकमतचे ज्येष्ठ सदस्य डॉ. अशोक बोथरा तर पाहुणे म्हणून महापौर अंजली घोटेकर, जिल्हा क्रीडा अधिकारी अनंत बोबडे, मनपाचे सभापती राहुल पावडे, आयएमएचे अध्यक्ष डॉ. विजय करमटकर, सचिव डॉ. मनीष मुंधडा, डॉ. प्रकाश मानवटकर, नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार, डॉ. सुशांत नक्षिने, वर्षा कोठेकर उपस्थित राहणार आहेत.
शिबिरासाठी वेळेवरही उपस्थित राहून रक्तदान करता येणार आहे. त्यासाठी नावनोंदणी करण्याची गरज नाही. डॉ. बी. सी. रॉय यांच्या स्मृतिनिमित्त देशभरात १ जुलै हा डॉक्टर डे म्हणून पाळला जातो. तर, १ जुलै ते ७ जुलै हा डॉक्टर्स विक म्हणून पाळला जातो.
स्व. बाबूजींच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून आयएमएच्या सहकार्यातून हा रक्तदान शिबिराचा उपक्रम सामाजिक उपक्रम व्हावा, यासाठी आयएमए पदाधिकारी व सामाजिक संस्था या शिबिरासाठी सरसावल्या आहेत.
या शिबिरामध्ये रक्तदान करून रक्तदात्यांनी या सामाजिक उपक्रमात मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, अशी विनंती आयएमएचे अध्यक्ष डॉ. विजय करमरकर, सचिव डॉ. मनीष मुंदडा व चंद्रपूर लोकमत जिल्हा कार्यालयाच्यावतीने करण्यात आली आहे.
अधिक माहितीसाठी अमोल कडुकर ९२७०१३१५८०, पूजा ठाकरे ९०११३२२६७४ या क्रमांकावर संपर्क साधावा.
रक्तदात्यांना मिळणार
प्रमाणपत्र व प्रथमोपचार
कीट
इंडियन मेडिकल असोशिएशनच्या सहकार्याने होणाऱ्या या रक्तदान शिबिरात रक्तदान करणाऱ्या नागरिकांना ब्लड डोनर कार्ड दिले जाणार आहे. या सोबतच प्रमाणपत्र देऊन गौरवित केले जाणार आहे. तसेच रक्तदात्यांना प्रथमोपचार कीट दिली जाणार आहे.
लोकमत सखी मंच,
युवा नेक्स्ट सदस्यांना
आवाहन
बाबूजींच्या जयंतीनिमित्त होणाऱ्या या सामाजिक उपक्रमात लोकमत सखी मंच, लोकमत युवा नेक्स्टचे सर्व सदस्य, वृत्तपत्र विक्रेतेबंधंूसह महाविद्यालयीन युवकांनी सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.