आजपासून कुणबी समाजाचा उपवर-वधू परिचय मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:23 AM2020-12-25T04:23:26+5:302020-12-25T04:23:26+5:30

चंद्रपूर : कुणबी समाज मंडळ चंद्रपूर आणि मध्यवर्ती धनोजे कुणबी समाजपुरस्कृत राज्यस्तरीय ऑनलाइन उपवधु-वर परिचय मेळाव्याचे आजपासून पुढील तीन ...

From today, the bride and groom should meet | आजपासून कुणबी समाजाचा उपवर-वधू परिचय मेळावा

आजपासून कुणबी समाजाचा उपवर-वधू परिचय मेळावा

Next

चंद्रपूर : कुणबी समाज मंडळ चंद्रपूर आणि मध्यवर्ती धनोजे कुणबी समाजपुरस्कृत राज्यस्तरीय ऑनलाइन उपवधु-वर परिचय मेळाव्याचे आजपासून पुढील तीन दिवस आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा कुणबी समाज मंदिर, लक्ष्मीनगर चंद्रपूर येथे होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा ऑनलाइन पद्धतीने आणि मोजक्या लोकांच्या उपस्थितीत घेण्यात येणार आहे. या मेळाव्याचे थेट प्रक्षेपण आणि रेकॉर्डिंग मंडळाच्या अधिकृत कुणबी समाज चंद्रपूर या यु-ट्यूब चॅनेलवर प्रक्षेपित करण्यात येणार आहे.

मेळाव्याचे उद्घाटन २५ डिसेंबरला सकाळी ११ वाजता धनोजे कुणबी समाज भवन येथे होणार आहे. उद्घाटक म्हणून खासदार बाळू धानोरकर, अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. पुरुषोत्तम सातपुते राहतील. यावेळी आमदार प्रतिभा धानोरकर, पांडुरंग टोंगे, पवन राजूरकर, अनंत एकरे, दिनकर डोहे, रमेश राजूरकर, डॉ. पांडुरंग जरीले, अ‍ॅड. संतोष कुचनकर, मेघराज जोगी, मधुकर ढोके, उत्तमराव मोहितकर, समाधान धानोरकर, भरत पोतराजे, प्रभाकर मोरे आदींची उपस्थिती राहणार आहे.

या ऑनलाइन वधू-वर परिचय मेळाव्याचा लाभ घेण्यासाठी सर्व समाजबांधव, उपवर-उपवधूंनी कुणबी समाज चंद्रपूर या यु-ट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे व बेल ऑयकॉनला प्रेस करावे, असे आवाहन कुणबी समाज मंडळ, उपवर-वधू परिचय मेळावा आयोजन समिती चंद्रपूरच्या वतीने करण्यात आले आहे.

त्रिदिवशीय ऑनलाईन उपवर उपवधू मेळाव्यात धनोजे कुणबी सभागृह लक्ष्मीनगर वडगाव चंद्रपूर येथे प्रत्यक्ष परिचय देण्यासाठी इच्छुक असल्यास डाॅ. मीनाताई माथनकर यांच्याशी संपर्क करून आपला दिवस निश्चित करून घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

--

कोट

कोरोना संकटामुळे यावर्षी परिचय मेळावा उपवर-वधू तसेच त्यांच्या आई-वडीलांच्याच उपस्थितीत होणार आहे. तीन दिवस परिचय मे‌ळावा चालणार आहे. या मेळाव्यापासून समाजबांधव वंचित राहू नये यासाठी कुणबी समाज चंद्रपूर या यु ट्यूब चॅनलवर हा मेळावा बघण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. याचा लाभ समाजबांधवांनी घ्यावा.

-ॲड. पुरुषोत्तम सातपुते

अध्यक्ष, धनोजे कुणबी समाज मंडळ, चंद्रपूर

Web Title: From today, the bride and groom should meet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.